Corona : सेवाग्राम रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत होणार कोरोनाची चाचणी, 1,150 चा चमू सर्वेक्षणासाठी जाणार घरोघरी - सेवाग्राम रुग्णालय प्रयोगशाळा
वर्धा जिल्हा जरी ग्रीन झोनमध्ये असला तरी खबरदारी घेणे महत्वाचे आहे. यासह जिल्ह्याला लागून असणाऱ्या इतर तीनही जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्यने वाढत आहेत. यासाठीच विदर्भात नागपूर, अकोलानंतर आता वर्धेतील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेला कोरोना चाचणीची परवानगी मिळाली आहे.
सेवाग्राम रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत होणार कोरोनाची चाचणी
वर्धा - कोरोनाच्या लढ्यात अधिकाधिक लोकांची चाचणी होणे महत्वाचे आहे. अशातच वर्ध्यातून नमुने हे नागपुरात चाचणीसाठी पाठवले जायचे. आता मात्र वर्धेकरांसाठी सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या अत्याधुनिक लॅबमध्ये कोरोनाच्या संभाव्य रुग्णांच्या चाचणीची परवानगी मिळाली आहे. यामुळे येत्या काळात 1,150 चमू हे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आणि गरज पडल्यास नमुने घेऊन चाचणी सुद्धा केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दिली.
तपासणीसह केले प्रात्यक्षिक
तपासणीचा अचूकता तपासण्यासाठी एक स्त्राव नमुना पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या मानांकनाप्रमाणे 100 टक्के जुळल्यानंतर सेवाग्राम आयुर्विज्ञान संस्था कोरोना चाचणी करण्यासाठी योग्य असल्याने येथे चाचणी करण्याच्या परवानगी मिळल्याने याचा फायदा कोरोनाला लढा देण्यासाठी होणार आहे.
सेवाग्राम प्रयोग शाळेची विशेषता
यासाठी संस्थेतील एक सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि तीन तंत्रज्ञ यांचे एम्स येथे चाचणीसंदर्भात प्रशिक्षण घेतले आहे. महाविद्यालयात पूर्वीच बीएसएल - 3 प्रयोगशाळा आहे. चाचणीसाठी लागणारे महत्वाचे म्हणजे टेस्टिंग एजंट आहे. या प्रयोगशाळेत उणे 20,आणि 80 तापमानावर यासंदर्भातील टेस्टिंग एजंट ठेवण्याची सुविधा आहे. कोरोना चाचणी आम्ही नागपूर एम्सच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. ही परवानगी संस्थेच्या गौरवात भर टाकणारी आहे.घरोघरी जाऊन काय? करणार चमू
कोरोना चाचणीची तपासणीची वर्धेत होणार आहे. यामुळे घरो घरी जाऊन मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण करणे शक्य झाले आहे. यासाठी 1150 चमू ही जवाबदारी पार पाडणार आहे. घरोघरी जाऊन नागरिकांना ताप ,सर्दी ,खोकला, श्वास घ्यायला त्रास आदी लक्षणांबाबत माहिती घेणार आहेत. प्राथमिक उपचार उपलब्ध करून दिला जाणार आहे. लक्षणे आणि चाचणीची गरज असल्यास तात्काळ नमुने घेतले जाणार असल्याचे शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी सांगितले.
चाचणी कोरोनाचा लढ्यातील महत्वाचे शस्त्र ठरणार
जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय प्रथमिक आरोग्य केंद्रात फिव्हर क्लीनिकची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. तिथे येणाऱ्या तापाच्या रुग्णांचे स्त्राव आता टेस्टिंगसाठी पाठवता येतील. कुणी संशयित वाटत असेल तर त्याची चाचणी वर्धेतच होणार असल्यामुळे अहवाल लवकर प्राप्त होऊन उपचार करणे अधिक सोयीचे होणार आहे. या परवानगीमुळे कोरोनाचा लढ्यात मोठं शस्त्र उपलब्ध झाल्याने मोठा फायदा होणार असल्याचे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिली.