महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...या टेस्टद्वारे कोरोना आहे की नाही, घरीच करा माहीत - कोरोना खबरदारी वर्धा बातमी

वर्ध्यातील दत्तपूर कंटेन्मेंट झोनमध्ये असणाऱ्या नागरिकांची 'वन मिनिट सीटअप आणि सिक्स मिनिट वाक टेस्ट' तपासणी करण्यात आली. या टेस्टमध्ये मिनिट उठाबशा किंवा सहा मिनिटे चालत त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन मोजण्यात आले.

'वन मिनिट सीटअप आणि सिक्स मिनिट वाक टेस्ट'
'वन मिनिट सीटअप आणि सिक्स मिनिट वाक टेस्ट'

By

Published : Jun 23, 2020, 9:05 PM IST

वर्धा -सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत चाललेली आहे. यासाठी कोरोनाची चाचणी मोठ्या प्रमाणात करणे कठीण होत आहे. याचवेळी आयसीएमआरने 'वन मिनिट सीटअप आणि सिक्स मिनिट वाक टेस्ट' सांगितले आहे. याचा अवलंब वर्ध्यातील दत्तपुर येथील कंटेंमेंट झोनमधील रहवासी असलेल्या व्यक्तींना तपासण्यासाठी झाला. शिवाय आशा वर्कर आणि आरोग्य सेविकांना प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले.

वर्ध्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या संकल्पनेनुसार आयएमए आणि वैद्यकीय जनजागृती मंचाच्या वतीने वर्ध्यातील दत्तपूर कंटेन्मेंट झोनमध्ये असणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात आली. या टेस्टमध्ये सलग एक मिनिट उठाबशा किंवा सहा मिनिटे चालत त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन मोजण्यात आले. यात 46 जणांची चाचणी करण्यात आली. यात सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे निदर्शनास आले.

आएमएने दिले प्रशिक्षण -

या टेस्टचा अवलंब मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण असल्यास करण्यात येतो. वर्ध्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने पुढील काळात कंटेन्मेंट झोनमध्ये ही टेस्ट करून नागरिकांची तपासणी करणे सोपे होणार आहे. शिवाय ज्या रुग्णांमध्ये लक्षणे नाही, अशा व्यक्तींना शोधण्यासाठी मदत होणार आहे.

आज दत्तपूर येथे तपासणी करण्यात आली. यात पुढील काळात प्रादुर्भाव वाढल्यास कंटेन्मेंट झोनमध्ये आरोग्य सेविकांना प्रशिक्षण देण्याचे काम इंडियन मेडिकल असोसिएशन आणि वैद्यकीय जनजागृती मंचाच्या वतीने करण्यात आले.

टेस्ट केव्हा करावी आणि कशी -

ही टेस्ट सहज केल्या जाऊ शकेल. यासाठी फक्त ऑक्सिमिटर म्हणजे ऑक्सिजन मोजण्याचे बोटाला लावणारे यंत्र गरजेचे आहे. यात तुम्ही घरात असाल तरी सहज तपासू शकता. यात सुरुवातीला ऑक्सिमिटरने ऑक्सिजनचे प्रमाण मोजून घ्या, हे 95% वर असेल. यात 1 मिनिट घडी लावून उठबशा काढाव्या, त्यानंतर पुन्हा टेस्ट करावे. जर, यात ऑक्सिजनचे प्रमाण हे 94% टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल तर, वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. अशाच पद्धतीने फक्त उठाबशाऐवजी सहा मिनिटे सलग चालून प्रमाण मोजावे. यात संशय वाटत असल्यास किंवा तशा व्यक्तीच्या संपर्कात आल्यास दर दोन दिवसांनी तपासणी करावी.

याचा फायदा कसा होणार -

यात कोरोनाचा लक्षणे दिसण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी लागतो. बरेचदा लक्षणेसुद्धा दिसून येत नाही. किंवा सर्दी खोकल्यासरखी प्राथमिक लक्षणेसुद्धा दिसून येत नाही. त्यामध्ये अगदी सुरुवात असताना कोरोना प्रादुर्भाव झाला का, हे लक्षात येऊ शकले. यामुळे लवकरात लवकर उपचार सुरू होऊन रुग्ण बरा होण्यास मदत होईल शिवाय इतरांना संसर्ग टाळला जाऊ शकेल. यामध्ये घाबरून न जाता कोरोनाच नव्हे तर अस्थमा, दमा, हृदयरोग, इतर फुफ्फुसाचे आजार, न्यूमोनिया या आजारांचीही माहिती मिळू शकते. यामुळे लक्षात आल्यास वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी बोरकर, डॉ. किमया गंधे, आयएमएचे डॉ.संजय मोगरे, डॉ. विपीन राऊत, डॉ. शंतनू चव्हाण, डॉ. सचिन पावडे तसेच यावेळी सागर राचलवार उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details