महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

सध्या कोरोनाचा शिकरकाव पाहता काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनाची रुग्णसंख्या 1 हजार 775 वर असून यात 1000 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 33 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसात चाचणी वाढल्याने आता रुग्णसंख्या वाढू लागली आहे.

वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय
वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय

By

Published : Sep 9, 2020, 3:08 AM IST

वर्धा - वर्ध्यात कोरोनाची रुग्णसंख्या मागील काही दिवसात झपाट्याने वाढत आहे. जिल्हाधिकारी कार्यलयात सुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कुटुंबाला कोरोनाचा लागण झाली आहे. यामुळे जिल्हाधिकरी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारी यांचे दालन आणि खनिकर्ण विभागाचे दालन बंद करण्यात आले. यासह प्रशासकीय भवनातील रोजगार हमी योजना कार्यालय तसेच हिंगणघाटचे तहसीलदार हे सुद्धा पॉझिटिव्ह आले आहे.

वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय
सध्या कोरोनाचा शिकरकाव पाहता काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनाची रुग्णसंख्या 1 हजार 775 वर असून यात 1000 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 33 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसात चाचणी वाढल्याने आता रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यात आता जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने दालन बंद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी वाढलेली होती. यासह वाढत्या रुग्णसंख्यने रुग्णालयात लक्षण नसल्याची गर्दी वाढू लागली आहे. यामुळे दवाखान्यात सुद्धा बेड वाढवून अधिका-अधिक रुग्णांना सोयी देण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details