वर्धा – टाळेबंदीमध्ये अडचणीत सापडलेल्या वर्ध्यातील बांधकाम मजुरांना दिलासा मिळाला आहे. संकटात सापडलेल्या बांधकाम मजूरांच्या बँक खात्यात 2 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. हे दोन हजार रुपये इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाने मदत म्हणून जमा केले आहेत.
टाळेबंदीच्या काळात बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्याने बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या मजुरांच्या उदरनिवार्हाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाने त्यांच्याकडे नोंद असलेल्या जिल्हयातील 43 हजार 923 कामगारांना आर्थिक मदतीचा लाभ दिला आहे. त्यांच्या बँक खात्यात 8 कोटी 78 लाख 46 हजार रुपये थेट जमा करण्यात आले आहेत.
राज्यासह जिल्हयात टाळेबंदी सुरू असल्याने उद्योग, व्यवसाय, व्यापार, बांधकाम व वाहतुक व्यवस्था इत्यादी बंद करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. बांधकाम कामगारांचा प्रश्न पुढे येताच इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाने कामगारांना मदतीचा हात दिला.
दिलासादायक! बांधकाम मंडळाकडून 44 हजार कामगारांना प्रत्येकी दोन हजारांची मदत - wardha labour officer news
टाळेबंदीच्या काळात बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्याने बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या मजुरांच्या उदरनिवार्हाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाने त्यांच्याकडे नोंद असलेल्या जिल्हयातील 43 हजार 923 कामगारांना आर्थिक मदतीचा लाभ दिला आहे.
![दिलासादायक! बांधकाम मंडळाकडून 44 हजार कामगारांना प्रत्येकी दोन हजारांची मदत बांधकाम मजूर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-07:49:48:1592576388-mh-war-kamgar-money-transfer-photo-7204321-19062020194832-1906f-1592576312-305.jpg)
यादीतील कामगारांच्या बँक खात्याची पडताळणी करून अचूक खाते क्रमांक असलेल्या बांधकाम कामगारांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले आहेत. उर्वरित बांधकाम कामगाराचे चुकीचे बँक खाते आहे. त्यांचा बँक खाते क्रमांक दुरुस्ती करून पाठविण्यात येत असल्याचे सरकारी कामगार अधिकारी पवनकुमार चव्हाण यांनी सांगितले.
सरकारी कामगार अधिकारी यांचे अधिपत्याखाली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचेवतीने बांधकाम क्षेत्रातील 21 प्रकारच्या कामगाराची नोंदणी करण्यात येते. कामगाराच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजना मंडळाकडून राबविण्यात येतात. यामध्ये कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती, कामगारांचा मृत्यु झाल्यास अर्थसहाय्य, बांधकाम कामगारांना साहित्य वाटप अशा 19 योजनांचा समावेश आहे. जिल्ह्यात 31 मार्च अखेर 21 क्षेत्रातील 80 हजार 265 बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 54 हजार 48 बांधकाम कामगारांनी नुतणीकरण केले आहे.