वर्धा -जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. 8 मेपासून निर्बंध सुरू झाले असून 13 मेपर्यंत हे निर्बंध असणार आहे. या काळात देवळी मतदार संघातील नाचण गावात तपासणी शिबीरावरून वाद निर्माण झाला. यातच कॉंग्रेसचे माजी मंत्री, आमदार रणजित कांबळे यांनी राजकरण करत आहे, असे म्हणत जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ केली आहे.
वर्धा : काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांनी केले आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ - आमदार रणजित कांबळे
आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉक्टर अजय डवले यांना फोनद्वारे विचारणा केली. एकीकडे लॉकडाऊन असताना राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या शिबिरावर राजकारण करत आहे काय? असा प्रश्न आमदार कांबळेनी करत चाचणी शिबिराबद्दल आक्षेप घेतला. मात्र संतप्त झालेल्या आमदार रणजित कांबळे यांचा पारा चढला आणि बोलण्याच्या तोल सुटला. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यास शिवीगाळ करत धमकी दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहमीच अँटिजेन चाचणी होत असते. एकीकडे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू असतांना नाचणगाव येथे शाळेच्या परिसरात अँटीजेन आणि आरटीपीसीआर चाचणी शिबीर घेण्यात आले. शिबीर घेताना स्थानिक लोकप्रतिनिधी तेथे नियमाचे उल्लंघन करून शिबीरात उपस्थित होते. तेथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. जवळच ग्रामीण रुग्णालय असतांना मग शिबिराला राजकीय स्वरूप देण्याचे कारण काय, असा प्रश्न आमदार रणजित कांबळे यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा -कोरोनाच्या स्थितीत काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर