वर्धा- वर्ध्यात पहिल्या टप्प्यातील सकाळच्या दोन तासात ७.३२ टक्के मतदान झाले आहे. मात्र, या ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव शोधताना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अनेक मतदारांना आपले मतदानकेंद्र कोणते आहे, याची माहितीच न मिळाल्याने एकच गोंधळ उडाला आहे.
मतदार यादीत नाव सापडेना, वर्धा मतदारसंघात मतदारांचा गोंधळ - wardha
प्रशासनाकडून मतदानाची पावती पोहचू न शकल्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला. ही पावती मतदारांना देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून प्रशानसनाने याबाबत हलगर्जीपणा केला असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
वर्धा मतदारसंघात मतदारांचा गोंधळ
मतदान केंद्रावर येऊन मतदारांना यादीमध्ये आपल्या नावाची शोधा-शोध करावी लागली. अनेकांचे मतदान केंद्र बदलले असल्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ उडाला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी याबाबत जिल्हाधिकार्यांना तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.
प्रशासनाकडून मतदानाची पावती पोहचू न शकल्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला. ही पावती मतदारांना देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून प्रशानसनाने याबाबत हलगर्जीपणा केला असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.