वर्धा - काटोल ते खरांगणा रस्त्यावर खरांगणा पोलीस ठाण्याचे ठाणेदार व एसटी महामंडळाचा बसचालक यांच्यात वाद झाला. त्यामुळे हा रस्ता जवळपास तीन तास बंद होता. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चालकाने माझ्या गाडीला कट मारला म्हणुन समज दिली तर चालक म्हणाला गाडीवर चिखल उडाल्याने मला मारहाण केली.
पोलीस अधिकारी व बस चालकात वाद दरम्यान, आंजी फपोलीस चौकीचे काम आटोपून खरांगणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार हे खरांगणा जात असताना हा वाद झाला. यामुळे बस चालकाने तिथेच गाडी उभी केल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या. यावेळी तब्बल तीन तास हा प्रकार चालल्याने प्रवाश्यांना याचा मोठा फटका बसला.
आर्वी वर्धा यामार्गाचे रस्त्याच्या सिमेंटिकरणाच्या काम सुरू आहे. सध्या मातीकाम आणि मुरुम टाकला जात आहे. त्यात पाऊस असल्याने रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. एसटी महामंडळाचा वाहन चालकाचे प्रसन्नजित मुन अस नाव आहे. तर खरांगणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष शेगावकर हे पोलीस वाहनाने येत होते. त्यांचा बाजूने येणाऱया बसचालकाने भरधाव गाडी चालवत एसटी चालवत त्याने पोलिसांच्या गाडीला कट मारल्यामुळे शासकीय गाडीचे नुकसान झाले. त्यामुळे त्याला समज दिली असे ठाणेदार संतोष शेगावकर सांगत आहे. तर प्रसन्नजित मुन म्हणाले, खराब रस्त्यांमुळे चिखल उडाल्याने पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केली.
ही बातमी पसरताच इतर बस चालकांनी जागीच वाहने उभी केल्याने वाहन चालक संघटनेचे पदाधिकारी आणि परिवहन महामंडळाचे कर्मचारी हे पोहचले. यावेळी उपविभागिय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यासुद्धा पोहचत यातून मार्ग काढत वाहतूक सुरळीत करण्याचे सांगितले. यावेळी कर्मचऱ्याची तक्रार नोंदवून घेत पुढील चौकशी नंतर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले. तसेच प्रकरणाची चौकशी संपेपर्यंत संतोष शेगावकर यांना पोलीस मुख्यालयाला बोलावून घेण्यात आल्याने वाद मिटला. अखेर तीन तास वाहतूक खोळंबून राहिल्या प्रवाशी विद्यार्थी नौकारदार वर्गाला मोठा फटका बसला. यात पुढील चौकशी नंतरच काय ते पुढे येईल.