वर्धा- खरीप हंगाम लक्षात घेता २०१९-२० साठी नियोजनाची बैठक घेत शेतकऱ्यांसाठी बियाणे-खताचे नियोजन करावे. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज खरीप हंगाम आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला जिल्हा अधीक्षक, उपसंचालक कापसे, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे - जिल्हाधिकारी
वर्ध्यात जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत खरीप हंगाम लक्षात घेता २०१९-२० साठी नियोजनाची बैठक घेत शेतकऱ्यांसाठी बियाणे-खताचे नियोजन करावे. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केली.
खरीप हंगाम लागवडीसाठी पर्याप्त बियाणे उपलब्ध असून दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर उद्भवल्यास कृषी विभागांनी बियाण्यांचे नियोजन करून ठेवावे. तसेच बोगस बियाण्यांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई करावी. फवारणी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. १०० टक्के शेतकऱ्यांनी पिक विमा काढण्यासाठी जनजगृती करावी. तसेच विद्युत वितरण कंपनीने कृषीपंपाचे प्रलंबित असलेले क नेक्शन जोडणी करून द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी कृषी विभागाला दिल्या.
खरीप हंगाम २०१९-२० मध्ये ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टर क्षेत्र एकुण लागवडी खाली राहणार आहे. यामध्ये कापूस २ लाख ३५ हजार ५०० हेक्टर, सोयाबिन १ लाख २५ हजार २५० हेक्टर तर तूर ६५ हजार हेक्टरवर लागवडीचा अंदाज आहे. यावर्षासाठी एकूण ७५ हजार ७६७ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये २१ हजार ६८७ क्विंटल बियाणे महाबिजकडून तर ५४ हजार ८० क्विंटल बियाणे इतर कंपन्याकडून पुरविण्यात येणार आहे. याशिवाय खरीप हंगामासाठी १ लाख २६ हजार २७० मेट्रीक टन खताची मागणी करण्यात आली आहे.