वर्धा - तुमच्या पणजोबांनी सांगितले, आजींनी सांगितले, बाबाने सांगितले, आईने सांगितले अन् आता राहुल गांधीही सांगतात गरिबी हटवू. पण गरीबी हटली नाही, तर वाढली. काँग्रसने सामान्य माणसांची नाही, तर चेल्याचपाट्यांची गरीबी दूर केल्याचा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर वर्ध्यातील केला. वर्षाला 72 हजार रुपये राहुल गांधी गरीबांना देऊ म्हणतात, मात्र पैसे आणणार कुठून असा सवालही त्यांनी यावेळी केला.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की 72 हजार रुपये देऊ हे मुंगेरीलालच्या स्वप्नासारखे आहे. कोंबडी आणि अंड्याचा धंदा राहुल गांधी बंद करावा असेही ते म्हणाले.
राहुल गांधी आणि पक्षात खोटे बोलणारे लोकं आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी खुमासदार किस्सा सांगत धमाल उडवली. यांनी देशाचे भले केले नाही, तर फक्त स्वतःचे भले केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
यापूर्वी मुंबईतील बॉम्बस्फोट हल्ला झाला तेव्हा तीव्र निषेध केला. युनोत जाऊन एखाद्या लाहान पोराने सांगावे, तसे पाकिस्तानला रागवा असे म्हणत 120 कोटीच्या देशाचे तत्कालीन पंतप्रधान झालेल्या हल्ल्याचा बदला घेऊ शकत नव्हते. पण पंतप्रधान मोदींनी हे करून दाखवले. तसेच बालाकोटच्या हल्ल्यावर बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली.