वर्धा- राज्यात कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आता एकूण कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 690 वर पोहोचली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे शहरे ओस पडली आहेत. तर वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमालाही 83 वर्षांत पहिल्यांदाच कोरोनामुळे कुलूप लागले आहे.
कोरोना इफेक्ट : 83 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच 'सेवाग्राम'ला कुलूप, गरज पडल्यास क्वारंटाईनसाठी करणार वापर - कोरोना विषाणू
सेवाग्राम आश्रम बंद असले तरी या ठिकाणी दैनंदिन प्रार्थना सुरू आहे. येथे राहणारे सेवक प्रार्थना करतात. या सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधी सुमारे 10 वर्षे राहिले होते.

सेवाग्राम आश्रम बंद असले तरी या ठिकाणी दैनंदिन प्रार्थना सुरू आहे. येथे राहणारे सेवक प्रार्थना करतात. या सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधी सुमारे 10 वर्षे राहिले होते. आश्रमाच्या परिसरातील काही आश्रमवासी दररोज आश्रमाची सफाई करतात. येथील गोशाळातील जनावरांची देखभाल नित्यनेमाने सुरू आहे. मात्र, सूतकताई आणि खादी कापडांची निर्मिती बंद करण्यात आली आहे.
सेवाग्रामला सरासरी एरवी 500 ते 1 हजार पर्यटक भेट देतात. मात्र, लॉकडाऊनमुळे हा परिसर सामसूम आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण जिल्ह्यात आढळला नाही आहे. मात्र, पर्यटकांसाठीचे यात्री निवास अधिग्रहित करण्यात आले आहेत. गरज पडल्यास कोरोनाबाधित रुग्णांना येथे ठेवण्यात येणार आहे.