वर्धा -संपूर्ण महाराष्ट्रभर मागील सात महिन्यांपासून चित्रपटगृह बंद आहे. अनलॉक फेजमध्ये 50 टक्के क्षमतेवर चित्रपट गृह सुरू करायला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. पण दाखवायला चित्रपटच नसल्याने स्क्रीन आद्यपही ऑफ असल्याचे चित्र राज्यभर पाहायला मिळत आहे. नवीन चित्रपट हे ऑनलाइन माध्यमांना विकले गेल्याने परवानगी भेटूनही परिस्थिती जैसे थे असल्याचेही सांगितले जात आहे.
चित्रपटगृहे बंद असताना अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र, दुसरे नवीन चित्रपट बनू शकले नाही. चित्रपटगृह बंद असल्याने अनेक चित्रपट ऑनलाइन माध्यमांना विकले गेले. त्यामुळे आता चित्रपटगृहे खुली झाले असले तरी स्क्रीनवर दाखवण्यासाठी त्याच्याकडे चित्रपट नसल्याने दाखवायचे काय, असा प्रश्न आहे. यामुळे चांगला चित्रपट रिलीज होण्याचा प्रतीक्षेत चित्रपटगृहचालक आहे. चित्रपटगृहांना 50 टक्के क्षमतेवर परवानगी मिळाली असली तरी महाराष्ट्रातील एकाही चित्रपटगृहात प्रेक्षक पोहचला नाही.
वर्ध्यात सर्व चित्रपटगृहे सिंगल स्क्रीन असून राज्यभरात साधारण 700 सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे आहेत. तेच मोठ्या शहरात एकापेक्षा जास्त स्क्रीन असणारे 250 चित्रपटगृहे आहेत. या सर्व चित्रपटगृहात दिवसभरात एकही शो चालला नसल्याचे 'सेंट्रल सर्किट सिने असोसिएशन'चे माजी कोषाध्यक्ष तथा विदर्भ विभागाचे प्रादेशिक सदस्य प्रदीप बजाज यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.
लॉकडाऊन काळात चित्रपट 'ओटीटी' प्लॅटफॉर्मवर विकले गेले
सर्वत्र लॉकडाऊन असताना चित्रपट निर्मात्यांना रिलीज झालेल्या चित्रपटाचा खर्च काढण्यासाठी पर्याय म्हणून ओटीटी म्हणजे 'ओव्हर दि टॉप' या माध्यमांवर म्हणजेच नेटफलिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिझ्नी हॉटस्टार यावर विकले गेले. त्यामुळे सध्या रिलीज होण्याच्या प्रतीक्षेत, तर काही निर्माण झालेले पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे बंद थिएटरवर निर्माते आणि दिग्दर्शक यांना पर्याय मिळाला. मात्र, चित्रपटगृहांना मागील सात महिन्यांपासून टाळे लागल्याने आर्थिक नुकसान होत आहे. आता जरी चित्रपटगृहे सुरू झाली असली तरीही त्यांच्यापुढे अडचणींचा डोंगर उभा आहे.
वितारकांकडे चित्रपट नाहीच, जुनेही मिळाले नाही