वर्ध्यात चिमुकल्याचा अपघात, कारवाईच्या मागणीसाठी मृतदेह पोलीस स्टेशनच्या आवारात - वर्धा कार अपघातात चिमुकला ठार बातमी
भरधाव कारने संकेत या बालकास जोरदार धडक दिली. या धडकेत तो फेकल्या गेल्याने नालीवर पडून गंभीर जखमी झाला. घटनेनंतर कार चालक हा पसार झाला. जखमी संकेतला आर्वीच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तळेगाव पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच पांडुरंग इंगळे या कार चालकास ताब्यात घेतले.
वर्ध्यात चिमुकल्याचा अपघात
वर्धा - तळेगाव पोलीस स्टेशनअंतर्गत चार वर्षीय बालकाचा वाहनाच्या धकडेत मृत्यू झाला. सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यात सुरक्षा फलक न लावल्याने कार चुकीच्या मार्गाने गेली. या भरधाव कारच्या धडकेत बालकाचा मृत्यू झाला. यामुळे गुरुवारी दुपारी हा मृतदेह तळेगाव पोलीस स्टेशनला आणण्यात आला. यात कंस्ट्रक्शन कंपनीवर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृत बालकाच्या कुटुंबीयांनी केली. संकेत चौधरी, असे चार वर्षीय मृत बालकाचे नाव आहे.
Last Updated : Sep 24, 2020, 10:48 PM IST