वर्धा - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 5 एप्रिलला दिवे आणि आणि मेणबत्ती पेटवण्याचे आवाहन केले आहे. यापेक्षा आज मोठ्या प्रमाणात बेरोजगार झालेल्या मजुरांच्या चुली कशा पेटतील यावर बोलायला पाहिजे होते. पण त्यांनी त्यावर एकही शब्द न बोलता मेणबत्ती आणि दिवे लावायचे सांगीतले हा प्रकार म्हणजे 'चिराग तले अंधेरा' असाच आहे. अशा शब्दात टीका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस यांनी केली.
'चिराग तले अंधेरा'.... महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांची टीका - चारुलता टोकस
दिवे जाळण्याचे सांगण्या ऐवजी त्या गरजू मजुरांसाठी काय करतो हे पंतप्रधानांनी सांगायला पाहिजे होते. त्याचा चुली कशा पेटतील याचं नियोजन अपेक्षित होते, अशा शब्दात टीका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस यांनी केली.
दिवे जाळण्याचे सांगण्या ऐवजी त्या गरजू मजुरांसाठी काय करतो हे सांगायला पाहिजे होते. त्याचा चुली कशा पेटतील याचं नियोजन अपेक्षित होते. जे आरोग्य कर्मचारी डॉक्टर नर्स पोलीस प्रशासन कोविड 19 या विषाणूला रोखण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करत आहे. त्याना सुरक्षा किट अद्याप पुरवू शकलो नाही, हे दुर्दैवी असल्याचेही त्या म्हणाल्या. याबरोबर कोरोनाची तपासणी जास्तीत जास्त लोकांची कशी करता येईल. याची तयारी आज नाही, यावर बोलने अपेक्षित होते. पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर न बोलता केवळ 'चिराग तले अंधेरा' अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना 5 एप्रिलला संध्याकाळी दिवे लावण्याचा वक्तव्यावर टीका महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांनी केली.