वर्धा - वर्ध्यात डॉ बाबासाहेब आंबेडर जयंतीच्या निमित्ताने नागरिकांनी शिस्त पाळत महामानवाला अभिवादन केले. शहरातील पोलीस मुख्यालयाजवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी अभिवादन केले. संविधान देणाऱ्या महामानवाला कोरोनाच्या काळात सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करून सामाजिक अंतर राखत जयंती साजरी कारण्यात आली.
शासनाच्या सूचनांचे पालन
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नागरिकांनी साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन वर्धा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार, कुठेही गर्दी होणार नाही आणि कोरोना नियमाचा भंग देखील होणार नाही, याची काळजी घेत जयंती साजरी करण्यात आली. तसेच यात्रा किंवा रॅली न काढता साध्या पद्धतीने मागील वर्षीप्रमाणेच कोरोनाच्या सावटाखाली जयंती साजरी करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी यांनीही घरी राहूनच महामानवाला अभिवादन करा, असेच आवाहन केले होते.
… पण यंदाही विद्युत रोषणाई
दरवर्षीप्रमाणे यंदा जय्यत साजरी होत नाही. तरी यंदाही त्याच पद्धतीने परिसर स्वच्छ केला. विद्युत रोषणाई करून आंबेडकर जयंतीसाठी चौकात व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती नगर परिषदेचे सीईओ विपिन पालिवाल यांनी दिली. यावेळी आंबेडकर पुतळ्याला नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवून अभिवादन केले.