महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कमालच आहे!... आता बसस्थानकातील सॅनिटायझरच्या बाटल्याही गेल्या चोरीला

बस स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेच्या उद्देशाने ठेवलेले हँडवॉश काही तासांतच चोरीला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता बादली आणि साबण सुद्धा दोरीने बांधून ठेवण्याची वेळ आली परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर आली आहे.

सस्थानकातील सॅनिटायझरच्या बाटल्याही गेल्या चोरीला
सस्थानकातील सॅनिटायझरच्या बाटल्याही गेल्या चोरीला

By

Published : Mar 20, 2020, 10:33 PM IST

Updated : Mar 20, 2020, 10:39 PM IST

वर्धा - वर्ध्यातील बस स्थानकावर प्रवाशांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या जात आहे. वर्धा बसस्थानकात प्रवाशांनी बसमध्ये चढण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्यावे, असे आवाहन केले जात आहे. पण हे हँडवॉश ठेवल्यानंतर काही तासांतच चोरीला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे आता बादली आणि साबण सुद्धा दोरीने बांधून ठेवण्याची वेळ आली परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर आली आहे.

कमालच आहे!... आता बसस्थानकातील सॅनिटायझरच्या बाटल्याही गेल्या चोरीला

जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या वर्धा बसस्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. कोरोनामुळे ही गर्दी काही प्रमाणात कमी झाली आहे. खबरदारी आणि सुरक्षेच्या दृष्टीने बस दोन वेळा किमान बसेस आणि प्रवाश्याचे बसण्याचे ठिकाणावर निर्जंतुकीकरण करण्याससाठी फवारणी केली जात आहे. शिवाय स्वच्छतेच्या अनुषंगाने जमीन पुसली जात आहे.

बसस्थानकावर स्वच्छता
बादली आणि साबण सुद्धा दोरीने बांधून ठेवण्याची वेळ
बादली आणि साबण सुद्धा दोरीने बांधून ठेवण्याची वेळ

नागरिकांना सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन केले जात होत आहे. शक्यतोवर घराबाहेर पडू नये. महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडावे लागल्यास प्रवाशांनी बसमध्ये चढण्यापूर्वी हात सॅनिटायझर किंवा हँड वाशने स्वच्छ धुवावे. पण हे हँडवॉश चोरून नेऊ नये. हे प्रवाशांना कोरोनाची लागण होऊ नयेत, यासाठीच ठेवण्यात आले आहे, असे आवाहन करावे लागले आहे. काही तासांतच लोखंडी पट्यांमध्ये अडकवलेल्या बॉटल चोरीला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे या वस्तू चोरून न नेता सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय नियंत्रक चेतन हसबनीस यांनी ईटीव्ही भारतच्या माध्यमातून केले आहे.

सॅनिटायझरच्या बाटल्याही गेल्या चोरीला
सस्थानकातील सॅनिटायझरच्या बाटल्याही गेल्या चोरीला
सस्थानकातील सॅनिटायझरच्या बाटल्याही गेल्या चोरीला

हेही वाचा - फिलिपाइन्स देशातून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेला तरुण कोरोना 'पॉझिटिव्ह'

हेही वाचा - रत्नागिरीत अत्यावश्यक सेवा वगळता बाकी बाजारपेठा बंद

Last Updated : Mar 20, 2020, 10:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details