महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईगलच बियाणं उगवलंच नाही, हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल - पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर आगसे

मध्यप्रदेशातील ईगल कंपनीने बाजारात विकलेले बियाणे उगवले नसल्याने पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामातील गुन्हा दाखल होण्याची पहलीच वेळ आहे.

hinganghat police station
हिंगणघाट पोलीस ठाणे

By

Published : Jul 4, 2020, 9:41 PM IST

वर्धा- मध्यप्रदेशातील ईगल कंपनीने बाजारात विकलेले बियाणे उगवले नसल्याने पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. हिंगणघाट येथील पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याच्या चौकशीत बियाणे कंपनीने सांगितलेल्या उगवन क्षमतेपेक्षा कमी उगवण झाल्याने तक्रार देण्यात आली. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामातील गुन्हा दाखल होण्याची पहलीच वेळ आहे. यात शीतल विठ्ठल चौधरी, असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

माहिती देताना पोलीस उपनिरीक्षक
हिंगणघाट तालुक्याच्या गोविंदपूर येथील शेतकरी शीतल विठ्ठल चौधरी यांची 60 एकर शेती आहे. त्यांनी ईगल कंपनीने बाजारातील विक्रीस असलेले सोयाबीनचे बियाण्याची लागवड केली. त्यावर जवळपास पाच ते सहा लाखाचा खर्च केला. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करूनही बियाणे उगवली नाहीत. यामुळे याबाबत त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरुन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह इतरांनीही शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत शीतल चौधरी यांच्या शेतात बियाणे उगविल्याचे दिसून आले नाही. यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची चौकशी करीत जमिनीत पेरलेले बियाणे घेत त्याचीही तपासणी केली. या तपासणीत बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याचे पुढे आले. यावरुन बियाणे कंपनीवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या. पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम.एस. डेहनकर यांच्या तक्रारीवरुन मध्यप्रदेशच्या 'ईगल सीड्स बायोटेक लिमिटेड इंदूर, मध्यप्रदेश' या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची मागणी सध्या होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर आगसे यांनी दिली आहे.
ईगल कंपनीची बियाणे चौकशीत निकृष्ट असल्याचे आले पुढे

शीतल चौधरी यांच्या सारखे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात ईगल कंपनीचे सोयाबीन लागवड झाली आहे. यात साधारण उगवन क्षमता ही 65 टक्के दाखवलेली असते. पण, प्रत्यक्ष तपासणी केली असता यात 13 टक्के उगवम क्षमता असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. हे बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे पुढे आले. यामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील शेतकऱ्यांंचे नुकसान झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांना कंपनीने आर्थिक नुकसान भरपाई देऊन मदत करण्याची मागणी केली जात आहे. शिवाय अशा पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

हेही वाचा -वर्ध्यातील वीज वितरण विभागातील 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

ABOUT THE AUTHOR

...view details