पुरात बैलगाडी अडकल्याने एका बैलासह गायीचा मृत्यू - गायीचा मृत्यू
नाला ओलांडून शेताकडे जाताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोन जनावरे वाहून गेल्याची घटना वर्धा येथे घडली. प्रसंगावधान राखत सालगडी सुभाष जुगनाके याने पुराच्या प्रवाहात पोहून स्वत:चा जीव वाचवला.
पुरात बैलगाडी अडकल्याने एका बैलासह गायीचा मृत्यू
वर्धा - गावालगतच्या नाल्यातून बैलगाडीने जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोन जनावरे वाहून गेल्याची घटना घडली. ही घटना समुद्रपूर तालुक्यातील विकणी (जसापूर) शिवारात घडली. प्रसंगावधान राखत सालगडी सुभाष जुगनाके याने पुराच्या प्रवाहात पोहून स्वत:चा जीव वाचवला. गावकाऱ्यांच्या मदतीने एका बैलाला वाचवण्यात जुगनाके यांना यश आले.