वर्धा- भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानी हद्दीत मोठी कारवाई केल्याची माहिती मिळताच संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा केला. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या हल्ल्याचा वर्ध्यात भाजप युवा मोर्चाकडून जल्लोष साजरा करण्यात आला.
पाकच्या भूमीत केलेल्या कारवाईचा भाजप युवा मोर्चाकडून जल्लोष - जल्लोष
भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या हल्ल्याचा वर्ध्यात भाजप युवा मोर्चाकडून जल्लोष साजरा करण्यात आला.
Wardha
युवा मोर्चाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष वरूण पाठक यांच्या नेतृत्वात युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला. पाकच्या भूमीत जाऊन दहशतवाद्यांच्या तळाला नष्ट करत भारताने हुतात्मा जवानांवरील हल्ल्याचा बदला घेतला आहे. या कारवाईने पुन्हा एकदा पाकला धूळ चारली असल्याचे वरूण पाठक यावेळी बोलताना म्हणाले.