महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या आमदार कांबळेंना तत्काळ अटक करा - रामदास तडस - आमदार कांबळेना तत्काळ अटक करा

आमदार रणजित कांबळे यांच्यावर सरकारी कामात हस्तक्षेप केल्यामुळे त्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी भाजपा खासदार रामदास तडस यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास भाजपाच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करु, असा इशाराही खासदार रामदास तडस यांनी दिला आहे.

भाजपा खासदार मागणी
भाजपा खासदार मागणी

By

Published : May 11, 2021, 3:50 PM IST

वर्धा -देवळीचे काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय डवले यांना केलेल्या शिवीगाळीचा निषेध भाजपाच्या वतीने नोंदविण्यात आला आहे. आमदार रणजित कांबळे यांच्यावर सरकारी कामात हस्तक्षेप केल्यामुळे त्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी भाजपा खासदार रामदास तडस यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास भाजपाच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करू, असा इशाराही तडस यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details