महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raid on Gambling Wardha : भाजपा आमदाराची जुगार अड्ड्यावर धाड; पोलिसांच्या कारभारावर व्यक्त केली नाराजी

भाजपाचे आमदार पंकज भोयर यांनी शनिवारी रात्री वर्ध्यातील जुगार अड्ड्यावर टाककेल्या धाड टाकली. विशेष म्हणजे रामनगर पोलीस स्टेशच्या हद्दीत आर्वी नाकावर महानगर पालिकेच्या जागेवर हा जुगार सुरू असल्याचे समोर आले.

आमदाराची जुगारावर धाड
आमदाराची जुगारावर धाड

By

Published : May 8, 2022, 7:59 PM IST

Updated : May 8, 2022, 8:11 PM IST

वर्धा - वर्धा शहारात मागील काही दिवसांपासून पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंद्यांना उत आला आहे. याची प्रचिती भाजपाचे आमदार पंकज भोयर यांनी शनिवारी रात्री जुगार अड्ड्यावर टाककेल्या धाडीत समोर आली. विशेष म्हणजे रामनगर पोलीस स्टेशच्या हद्दीत आर्वी नाकावर महानगर पालिकेच्या जागेवर हा जुगार सुरू असल्याचे समोर आले. यावेळी मात्र माझापर्यंत सामान्य नागरिकांना तक्रारी पोहचत असतांना पोलीस प्रशासन काय करत आहे? असा सवाल आमदार भोयर यांनी पोलिसांना पुढे उपस्थित केल्यावर पोलिसांची मात्र बोलती बंद झाल्याचे चित्र पहायला मिळाले आहे.

प्रतिक्रिया देताना आमदार भोयर


वर्ध्याचा आर्वी नाका परिसरात स्ट्रीट लाईटच्या छोटेखानी उद्घाटन कर्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आमदार पंकज भोयर पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट उपस्थित होते. दरम्यान स्थानिक नागरिकांनी आणि भाजपाच्या पदाधिकारी यांनी आमदार भोयर यांना या प्रकारांची माहिती दिली. यावेळी धाड टाकली असता सर्व दानाफान होत पसार झाले. परंतु या ठिकाणी जुगारातील चेंगळं नावाचा खेळ खेळला जात असल्याचे समोर आले. यावेळी रामनगर पोलीस स्टेशचे ठाणेदार यांना खडे बोल सुनावले. रामनगर पोलिसांत शामसुंदर कमालकिशोर सिद्ध वय 35, शेक तन्वीर शेक कादर, शुभम राजू टेम्भूरणे, विक्की नामदेवराव खिल्लारे या चौघांविरोधात सट्टापट्टीचे आकडे आणि इतर साहित्य जप्त करत गुन्हा दाखल करण्याची करवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली. आमदार भोयर यांनी टाकलेल्या धाडीनंतर पोलीस प्रशासनाला जाग आल्याने पोलिसांच्या कारभावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

हेही वाचा -Nashik Road Central Jail : पॅरोलवर असणाऱ्या 800 कैद्यांना जेलमध्ये परतण्याचे आदेश

Last Updated : May 8, 2022, 8:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details