वर्धा Anil Deshmukh Supari Allegation : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भोपाळमधील भाषणानंतर अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांचे अन्य सहकारी घाईघाईने शिंदे सरकारमध्ये (Shinde Government) सहभागी झाले होते, ते सरकारमध्ये का सहभागी झाले हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. तसंच शरद पवार (Sharad Pawar) यांचं राजकीय करियर उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपानंच अजित पवार यांना सुपारी दिल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी यावेळी केलाय.
भाजपावर गंभीर आरोप : राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पक्षावर ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्यासाठी भाजपानं अजित पवार यांना सुपारी दिली आहे, असे अनिल देशमुख म्हणाले. अजित पवार गटाचा मेळावा शुक्रवारी कर्जतमध्ये झाला. या मेळाव्यात अजित पवार यांनीही शरद पवार गटावर गंभीर आरोप केले आहेत.
बंड आणि सुनावणी : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करुन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ते सहभागी झाले. सरकारमध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद तर त्यांच्या अन्य आठ सहकाऱ्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दोन्ही गटांकडून दावा करण्यात येत आहे. आता हे सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडं प्रलंबित आहे. त्यावर सुनावणीही सुरू आहे.
अजित पवारांचा देशमुखांवर गंभीर आरोप : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार गटानं शुक्रवारी (1 डिसेंबर) कर्जत येथे दोन दिवसांचं शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. पक्षाच्या सर्व बैठकीला अनिल देशमुख देखील हजर होते. ते देखील आमच्यासोबत होते. मात्र, मला मंत्रिमंडळात स्थान मिळायला पाहिजे. मात्र, भाजपाकडून सांगण्यात आलं की देशमुख यांच्या नावासंदर्भात अनेकवेळा सभागृहात आणि बाहेर निदर्शने केली आहेत. त्यांना जर मंत्रिमंडळात घेतलं तर आमच्यावरील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्यामुळं त्यांना मंत्रिमंडळ घेता येणार नाही. त्यामुळं त्यांचं नाव कमी झालं. मला मंत्रिपद नाही तर मी तुमच्यासोबत नाही येणार, अशा पद्धतीचा निर्णय अनिल देशमुख यांनी घेतला ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ असल्याचं अजित पवार म्हणाले.
हेही वाचा -
- काहीजणं पावसात भिजण्याचं नाटक करतात; राष्ट्रवादीतील वादावर पुतण्यानं काकांना 'धो धो धुतले'
- काहीजणं पावसात भिजण्याचं नाटक करतात; राष्ट्रवादीतील वादावर पुतण्यानं काकांना 'धो धो धुतले'
- शरद पवारांकडे 'तेव्हा' पंतप्रधानपदाची संधी होती, मात्र त्यांनी ती घेतली नाही; प्रफुल पटेल यांचा गौप्यस्फोट