वर्धा- निवडणुका येताच मताचा जोगवा मागत फिरताना वर्ध्यातील सिंदी (रेल्वे) येथील भाजपच्या नगरसेवकाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात नगरसेवकाने महिला नगरसेविकेसमोरच नागरिकांना शिवीगाळ केली. समस्या सांगणाऱ्या सामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्याऐवजी त्यांनाच अश्लील शिवीगाळ केल्याने नागरिक संतप्त झाले. यातील एकाने हा व्हिडिओ व्हायरल केल्याने नगर सेवकावर टीका होत आहे. प्रकाश मेंढे असे या नगरसेवकाचे नाव आहे.
सिंदी रेल्वे येथील प्रभाग सातमध्ये दोन नगरसेवक आहेत. यात भूमीगत गटार योजनेचे काम सुरू असल्याने याची पाहणी करण्यात आली. या कामाच्या दर्जाबाबत तक्रारी असल्याने नगरसेवक प्रकाश मेंढे, नगरसेविका अजया साखळे या कामाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी काही नागरिक तेथे पोहोचले. यावेळी नागरिकांनी कामामुळे होत असलेल्या समस्याच पाढा वाचला.