वर्धा - सेवाग्राम येथे बँकेत खोटा बॉंम्ब अंगाला गुंडाळून ५५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे. स्वत: सुसाईड बॉम्बर असल्याचे भासवत तो कर्माचाऱ्यांना धमकवण्याचा प्रयत्न करत होता. चौकशीअंती आरोपीने कर्जबाजारीपणामुळे हा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे.
बॉम्ब अंगाला गुंडाळून बँकेत खंडणी मागणाऱ्यास अटक
वर्ध्याच्या सेवाग्राम येथे बँकेत खोटा बॉंम्ब अंगाला गुंडाळून ५५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे. स्वत: सुसाईड बॉम्बर असल्याचे भासवत तो कर्माचाऱ्यांना धमकवण्याचा प्रयत्न करत होता. चौकशीअंती आरोपीने कर्जबाजारीपणामुळे हा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे.
अशी घडली घटना
आरोपीने अधिकाऱ्यांना मी गंभीर आाजाराने त्रस्त असून ५५ लाख रुपयांची मागणी करणारे पत्र दिले. ४ जूनला सेवाग्रामच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत जाऊन सुसाईड बॉम्बर असल्याचे भासवत त्याने कर्मचाऱ्यांना धमकी दिली. पैसे न दिल्यास बँकेत बॉम्ब फोडेल असेही सांगितले. यावेळीस त्याने अंगाला डुप्लिकेट बॉम्ब आणि एक बंदूक घेऊन कर्मचाऱ्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला. याची माहिती पोलीसांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीस अटक केली. योगेश कुबडे असे आरोपीचे नाव असून तो सायबर कॅफेचा व्यवसाय करत होता. मात्र, कर्जबाजारीपणामुळे हा प्रकार केल्याचे तपासत पुढे आले.