वर्धा- वर्ध्यातील गिरड पोलीस आणि बजरंग दलाच्या साहायाने कत्तलखान्याकडे जात असलेल्या १६ गोवंश जनावरांना जीवनदान मिळाले आहे. तीन वाहने कत्तलखान्याकडे जाणार असल्याची माहिती बजरंग दलाल मिळाली होती. या माहितीच्या आधारावर गिरड पोलिसांनी गिरड कोरा मार्गावरून तीन वाहनांना नाकाबंदी दरम्यान थांबविले होते. त्यात ही १६ गोवंश जनावरे आढळून आली होती. या प्रकरणात शुभम वाडीभस्मे, निलेश डुकरे, सुरेंद्र गंधाटे या तिघांना अटक करण्यात आली आहे.
कत्तलखान्याकडे जाणाऱ्या तीन वाहनातील 16 जनावरांना जीवनदान - गिरड पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र ठाकूर
वर्ध्यातील गिरड पोलीस आणि बजरंग दलाच्या साहायाने कत्तलखण्याकडे जात असलेल्या १६ गोवंश जनावरांना जिवनदान मिळाले आहे. तीन वाहने कत्तल खाण्याकडे जाणार असल्याची माहिती बजरंग दलाल मिळाली होती. या माहितीच्या आधारावर गिरड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
![कत्तलखान्याकडे जाणाऱ्या तीन वाहनातील 16 जनावरांना जीवनदान](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3643062-thumbnail-3x2-cow.jpg)
गिरड भागातील बजरंग दलाच्या सदस्यांना तीन वाहने गोवंश घेऊन कत्तलखान्याकडे जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. ही माहिती त्यांनी गिरड पोलिसांना दिली. मिळालेल्या माहिती प्रमाणे पोलिसांनी गिरड कोरा मार्गावर नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान तीन वाहनांची तपासणी केली असता त्यात १६ गोवंश जनावरांना निर्दयतेणे कोंबून घेउन जात असल्याचे आढळून आले. गिरड पोलिसांनी वाहन चालकास विचारपूस केली असता यावेळी उडवा उडवीचे उत्तर मिळाले. तपासा दरम्यान वाहतूक परवाना न मिळाल्याने पोलिसांनी वाहने जप्त केली. शुभम वाडीभस्मे, निलेश डुकरे, सुरेंद्र गंधाटे अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहे. यावेळी पोलिसांनी एकूण १५ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्राथमिक चौकशीतून तिन्ही वाहने जनावरांना उमरेड येथून खरेदी केल्यानंतर चंद्रपूर येथील कत्तलखान्यात नेत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या जनावरांना गिरड येथील श्रीराम गौशाळेला सोपवले आहे. यावेळी बजरंग दलाच्या पुढाकाराने तीन वाहनातील १६ जनावरांना जीवनदान मिळाले. ही कारवाई गिरड पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र ठाकूर, पीएसआय दीपक निंबाळकर, पोलीस कर्मचारी संजय त्रिपाठी, बजरंग दलाचे निर्भय पांडे, राकेश दीक्षित आदींनी केली आहे.