महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक..! हिंगणघाटमध्ये तरुणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न - Attempts to burn girl with petrol in wardha

महाविद्यालयात तासिका तत्वावर शिकविणाऱ्या शिक्षक तरुणीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न हिंगणघाट येथे करण्यात आला आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र
घटनास्थळाची पाहणी करताना पोलीस

By

Published : Feb 3, 2020, 9:27 AM IST

Updated : Feb 3, 2020, 5:33 PM IST

वर्धा- तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्ह्यातील हिंगणघाटमधील नांदोरी चौकात सोमवारी (३ फेब्रुवारी) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.यामध्ये तरुणी जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे हिंगणघाट हादरले आहे.

घटनास्थळ

पीडित तरुण हिंगणघाटपासून १० किमी अंतरावर असलेल्या एका गावात राहते. ती दररोज हिंगणघाट येथे एका खासगी महाविद्यालयात शिकवण्यासाठी जात होती. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ती महाविद्यालयात जात असताना नांदोरी चौकात तिच्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटता टेंबा फेकला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.

काही स्थानिकांनी हा प्रकार पाहिला. काहींनी धाडस करत तिच्या अंगावर पाणी टाकून आग विझवत तिला उपजिल्हा रुग्णलयात नेण्यात आले. प्राथमिक उपचार करत तिला नागपूर येथे हलविण्यात आले.

पोलिसांनी घटना स्थळाची पाहणी करत चौकशी सुरू केली आहे. घटनेतील आरोपीची ओळख पटली असून तरुणी आणि तरुण एकाच गावातील असल्याचे सुद्धा पुढे आले आहे. यात आरोपी तरुण हा विवाहीत असून या घटनेतील तरुणीशी काय संबंध आहे? याचाही शोध पोलीस घेत आहेत. यात प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे. पण, पोलिसांनी अद्याप आरोपीचे नाव किंवा अन्य बाबींचा खुलासा केला नसून तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा - जागतिक पाणथळ दिन : बहार संस्थेने पक्ष्यांचा अधिवास केला स्वच्छ

Last Updated : Feb 3, 2020, 5:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details