महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा अध्यक्ष पटोलेंची मतदानाबाबतची मागणी चुकीची नाहीच - जयंत पाटील - मतपत्रिकेवर मतदान

विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंची मतपत्रिकेवर मतदान घ्या ही मागणी चुकीची नाहीच, अशी प्रतिक्रिया जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. तसेच पटोलेंच्या सुचनेवर राज्य सरकारने विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

जयंत पाटील
जयंत पाटील

By

Published : Feb 3, 2021, 5:04 PM IST

Updated : Feb 3, 2021, 5:09 PM IST

वर्धा -विधानसभेचे अध्यक्ष नाना पाटोले यांनी मतपत्रिकेवर मतदान घ्या, मतपत्रिकेला पर्याय द्या व त्यासाठी कायदा करा, अशा सूचना दिल्या होत्या. नाना पटोलेंनी केलेली मागणी चुकीची नाही, असे म्हणत नाना पटोलेंच्या सुचनेवर राज्य सरकारने विचार करावा. असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. पाटील आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील
विधानसभा अध्यक्ष पटोले यांनी अलीकडच्या काळात जे अनुभव आले आहेत. त्या अनुभवाच्या आधारे त्यांनी हे विधान केले आहे. मतदानाच्या संदर्भात लोकांच्या मनातील शंका जी मतमोजल्यानंतर निर्माण होत आहे. तो संशय आपल्याला खोडून काढायचा असेल तर मतपत्रिकेवर निवडणुका घेणे हे रास्त आहे. नाना पटोले यांनी केलेली मागणी चुकीची नाहीच. यामुळे त्यांनी केलेल्या सूचनांवर राज्य सरकारने विचार करावा, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.शिव वैभव येथे राष्ट्रवादीची अंतर्गत बैठक असून यासाठी ते वर्ध्यात आले होते.
Last Updated : Feb 3, 2021, 5:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details