वर्धा- वर्धा जिल्ह्यात सर्वत्र 'माझे कुटुंब, माझे जबाबदारी' अभियान राबवले जात आहे. या माध्यमातून आतापर्यंत जवळपास आठ लाख घरापर्यंत भेटी देण्यात आल्या आहेत. या मोहिमे दरम्यान १७४ कोरोनाबाधितांचा शोध घेण्यात यश आले आहे. यामुळे प्रकृती गंभीर होण्याअगोदर निदान झाल्यास मृत्युदर कमी करण्यास मदत होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी सांगितले.
माहिती देताना वर्धा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले कोरोना संसर्गापासून बचावासाठी घरोघरी जाऊन 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत या मोहिमेचे फलीतही दिसू लागले आहे. मोहिमेदरम्यान कुटुंबीयांना भेटून त्यांच्याकडून कुटुंबातील प्रत्येक सदस्याची माहिती गोळा केली जात आहे. यात त्या व्यक्तीची ऑक्सिजन मात्रा आणि सखोल विचारपूस करून लक्षणे जाणून घेतली जात आहेत. यात प्रकृती संदर्भात संशय आढळल्यास त्यांची चाचणी करून निदान केले जात आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास तात्काळ प्रकृती नुसार औषधोपचार केला जात आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित आणि मृत्यूची परिस्थिती..?
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पाच हजार पार झाली आहे. सध्या ५ हजार ३७१ रुग्ण नोंदवले गेले आहेत. यात १६० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्ण मिळण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी रोज ७० ते ८० च्या घरात नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे मृत्यूची आकडा कधी २ तर कधी ६ ते ७ वर सुद्धा जाऊन पोहोचला आहे. याला नियंत्रणात आणण्यासाठी खबरदारी घेणे महत्वाचे आहेच. शिवाय लक्षणे असल्यास लपवून न ठेवता चाचणी करून निदान करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने केले जात आहे.
महिमेचा फायदा कसा होतोय..?
यामुळे कोरोनाचा एकापासून दुसऱ्याला होणारा संसर्ग रोखला जात आहे. योग्यवेळी रुग्ण ओळखल्या गेल्याने त्याच्यावर वेळीच उपचार करणे सोपे होत आहे. यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर होण्यापासून बचाव होत आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत आहे. यात ऐन वेळी रुग्ण रुग्णालयात पोहोचत असल्याने त्याचे शरीर उपचाराला सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याने धोका वाढत आहे. हेच प्रामुख्याने लक्षात घेऊन ६०३ पथकाच्या माध्यमातून काम केले जात आहे. यात मास्क, सामाजिक अंतर आणि हात स्वच्छ धुण्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर, खबरदारीमुळे रुग्ण पुढे येत असल्याची माहिती, डॉ. अजय डवले यांनी दिली.
मोहिमेचे फलित काय?
या अभियानाच्या माध्यमातून आतापार्यंत ३ लाख २९ हजार ६४३ घरांना भेटी देण्यात आल्या आहेत. यात ७ लाख ७५ हजारच्या घरात नागरिकांची आरोग्य तपासणी झाली आहे. यामुळे या मोहिमेत सर्दी, खोकला, तप आजाराचे २ हजार ७६७ रुग्ण मिळून आले आहे. विशेष म्हणजे, यात ४७१ जण हे सरीच्या आजाराची लागण झालेले रुग्ण असून सोबत १७४ जण हे कोरोनाबाधित झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व रुग्णांना रुग्णालयात दाखल करत उपचार देण्यात आले आहे. यामुळे हे या योजनेचे फलित असून साध्या ५७.५२ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असून पुढील टप्प्यात इतर व्यक्तींची आरोग्य तपासणी होणार आहे.
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अभियानातून १३ लाख ४८ हजार ७५७ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यात ७ लाख ७५ हजार ९५२ व्यक्तींची तपासणी आतापर्यंत झाली आहे. यामुळे पुढील टप्प्यात उर्वरित नागरिकांची तपासणी केली जाणार असल्याने यासाठी ६०३ पथकातील आरोग्य कर्मचारी, आशा, स्वयंसेवी संस्था अनेकजण या मोहिमेत सहभागी झाले आहे. यामुळे यात पुढील काळात मृत्यूदराचा आकडा वाढू नये म्हणजे फलित झाले. अन्यथा योजनेचे अपयश शोधेपर्यंत आणखी काहींना आपला जीव गमवावा लागू नये, अशी आशा करावी लागणार आहे.
हेही वाचा- आष्टी तहसीलदारांच्या दालनाला आग, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली !