वर्धा - देवळी तालुक्यातील कोल्हापूर येथे आज दुपारी अचानक आग लागून गोठ्याचे मोठे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटने लागली असल्याचे सांगितले जात आहे. हा गोठा चंद्रभान पांझरे यांचा आहे. त्यांचे आगीत तब्बल 2 लाखांचे साहित्य जळून नुकसान झाले.
वर्ध्यातील कोल्हापुरात गोठ्याला आग, दोन लाखाचे साहित्य जळून खाक - Fire
चंद्रभान पाझारे यांची कोल्हापूर (राव) गावाला लागून सहा एकर शेती आहे. शेतात गोठा असून त्यात शेती साहित्य आणि जनावरे बांधलेली होती. या गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग लागल्याचे समजताच देवळी आणि पुलगाव येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, अग्निशामक दल येईपर्यंत साठवणूक केलेला जनावरांचा चारा आणि शेती उपयोगी साहित्य पूर्णतः जळून खाक झाले.

चंद्रभान पाझारे यांची कोल्हापूर (राव) गावाला लागून सहा एकर शेती आहे. शेतात गोठा असून त्यात शेती साहित्य आणि जनावरे बांधलेली होती. या गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग लागल्याचे समजताच देवळी आणि पूलगाव येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, अग्निशामक दल येईपर्यंत साठवणूक केलेला जनावरांचा चारा आणि शेती उपयोगी साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. गोठ्यात जनावरे बांधलेली नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घडलेल्या घटनेची माहिती देवळी पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. महावितरणचे कोणीही अधिकारी मात्र इकडे फिरकले नाहीत.