वर्धा : नागरिकांचे श्रद्धास्थान असलेले हे बाहुबली हनुमान मंदिर विदर्भात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दर शनिवारी व मंगळवारी भावीक मोठ्या संख्येने येत असतात. या ठिकाणी स्वयंपाक करून याच ठिकाणी जेवण करून जात असतात. आपल्या भक्तांच्या हाकेला धावून जाणारे देव म्हणून या बाहुबली हनुमान मंदिराला प्रसिद्ध प्राप्त आहे. तसेच या बाहुबली मंदिराला ऐतिहासिक वारसासुद्धा आहे. एक प्राचीन विहीर या मंदिराला लागून आहे. त्यामुळे या विहिरीतील पाण्याने आंघोळ केल्यास शरीराला असलेली रोगराई नष्ट होते, अशी आख्यायिका आहे.
मंदिराची आख्यायिका: त्यामुळे कोणत्याही वयाचा नागरिक असो, तो येऊन आपला वेळ या ठिकाणी घालवत असतात. तथा या विहिरीतील पाणी काढून त्याने आंघोळ करून या ठिकाणी पूजा करत असतात. या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे या विहिरीच्या तळापर्यंत पायऱ्या असल्याने पायऱ्या उतरून विहिरीतून हाताने पाणी काढता येते. त्यामुळे नागरिकांना जास्त कष्ट करावे लागत नाही. अतिशय जुनी ही विहीर आहे. या विहिरीला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. डोंगराळ चारी बाजूंनी डोंगराळ भागाच्या मधामध्ये हे बाहुबली मंदिर वसलेले आहे. अतिशय निसर्ग रम्य वातावरणामध्ये असल्याने नागरिकांच्या कल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असतो. आपल्या श्रद्धेचे स्थान असलेल्या बाहुबली हनुमान मंदिरात नागरिक मोठ्या आस्थेने येऊन पूजा अर्चना या ठिकाणी करत असतात. नवसाला पावणारे हे हनुमान मंदिर आहे. आपल्या भक्ताच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करत असते, अशी आख्यायिका या मंदिराची आहे.