महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्धा रेल्वे स्थानकावर मद्यपींचा धुडगूस, प्रशासनाने लक्ष देण्याची प्रवाशांची मागणी - वर्धा जिल्हा बातमी

वर्धा जिल्हा हा महात्मा गांधींची कर्मभूमी म्हणून ओळखला जातो. येथे दररोज हजारो प्रवासी महात्मा गांधी आणि विनोबांच्या पावन स्थळांना भेट देण्यासाठी येतात. वर्ध्यातील रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेचे रहदारीचे स्थानक म्हणून सुद्धा ओळखले जाते. ज्या जिल्ह्यात यात्री गांधींचे विचार आत्मसात करायला येतात त्याच शहराच्या रेल्वे स्थानकावर मद्यपींचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे.

वर्धा रेल्वे स्थानकावर मद्यपींचा धुडगूस

By

Published : Nov 19, 2019, 10:12 AM IST

वर्धा- जिल्ह्याच्या प्रत्येक भागात मद्यपी असतात. याच मद्यपीचा वावर आता रेल्वे स्थानकावरील फलाटवर दिसू लागला. सध्या रेल्वे स्थानकावर मद्यपींचा धुमाकूळ ही नित्याची बाब झाली आहे. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. मद्यपींचा या धुमकुळामुळे महिला प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

रेल्वे स्थानकावर मद्यपींचा धुडगूस

हेही वाचा - वर्ध्यात जि.प. सदस्याने बाळगली गावठी पिस्तुल, चुकून गोळी सुटल्याने मेव्हणी जखमी

वर्धा जिल्हा हा महात्मा गांधींची कर्मभूमी म्हणून ओळखला जातो. येथे दररोज हजारो प्रवासी महात्मा गांधी आणि विनोबांच्या पावन स्थळांना भेट देण्यासाठी येतात. वर्ध्यातील रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेचे रहदारीचे स्थानक म्हणून सुद्धा ओळखले जाते. ज्या जिल्ह्यात यात्री गांधींचे विचार आत्मसात करायला येतात त्याच शहराच्या रेल्वे स्थानकावर मद्यपींचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - प्रेमाचा संदेश द्या अन् मैत्रीचे नाते जोडा! पवनार आश्रमात मैत्री मिलन सोहळ्यातील उपक्रम

एवढंच नव्हे तर हे मद्यपी महिला प्रवाशांसह नागरिकांशी गैरवर्तणूक करताना दिसतात. रेल्वे पोलिसांचे याकडे दुर्लक्ष असून त्यांच्यावर कारवाईची मागणी प्रवाशी वर्गांकडून होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details