वर्धा - पुलगाव येथे फोटो काढण्याच्या नादात एका मुलाचा पंचधारा कुंडात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल दुपारच्या सुमारास घडली. अभास राऊत (वय १८) असे मृत मुलाचे नाव आहे. त्याची आई अरुणा राऊत या नगरसेविका आहेत.
पुलगाव येथे फोटो काढण्याचा नाद बेतला जिवावर; १८ वर्षीय मुलाचा मृत्यू - Panchdhara Kund death incident
पुलगाव येथे फोटो काढण्याच्या नादात एका मुलाचा पंचधारा कुंडात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना काल दुपारच्या सुमारास घडली. अभास राऊत (वय १८) असे मृत मुलाचे नाव आहे. त्याच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
आभास हा त्याच्या चुलत भावासोबत शेतात गेला होता. येताना दोघेही वर्धा नदीच्या पंचधारा कुंडाजवळ सेल्फी घेण्यासाठी थांबले. यावेळी सेल्फी घेताना आभासचा तोल गेल्याने तो कुंडात पडला व त्याचा बुडून मृत्यू झाला. आभासच्या चुलत भावाने घडलेल्या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. मृतदेह सापडल्यानंतर त्यांनी त्यास पुलगाव रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. नंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला. आभासवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा -पदवीधर रणधुमाळी : वर्ध्यात मतदान प्रक्रियेला सुरुवात; 23 हजार मतदार