वर्धा - तातडीने आरोग्य सेवा पुरवण्यासाठी '१०८ रुग्णवाहिका' हा उत्तम पर्याय आहे. मात्र, तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणी रुग्णवाहिकेवर वैद्यकीय अधिकारी नसल्याने तत्काळ रुग्णसेवा मिळण्यास अडचण होत आहे. 108 रुग्णवाहिका आणि त्यावर कार्यरत डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे कंत्राट पुण्यातील 'बीव्हीजी इंडिया' या कंपनीला देण्यात आले आहे.
वैद्यकीय अधिकार्याअभावी रुग्णवाहिकेला ब्रेक; कंत्राटी कंपनीचे दुर्लक्ष - 108 रुग्णवाहिका बातमी वर्धा
ग्रामीण रुग्णालय सेलू, राष्ट्रीय महामार्ग सहावर असलेले कारंजा शहर, उपजिल्हा रुग्णालय आर्वी आणि पूलगाव या चारही महत्त्वाच्या ठिकाणी प्रत्येक रुग्णवाहिकेवर कालावधीनुसार दोन डॉक्टरांची गरज आहे.
हेही वाचा-फुल्ल ढोसून झोपले तळीराम गुरुजी; विद्यार्थ्यांची पाटी राहिली कोरी
तत्काळ रुग्णसेवा देण्यासाठी 108 रुग्णवाहिकेचे विशेष महत्व आहे. आजही ग्रामीण भागातील नागरिक गरजेवेळी 108 नंबरवर संपर्क करतात. मात्र, ग्रामीण रुग्णालय सेलू, राष्ट्रीय महामार्ग सहावर असलेले कारंजा शहर, उपजिल्हा रुग्णालय आर्वी आणि पूलगाव या चारही महत्त्वाच्या ठिकाणी प्रत्येक रुग्णवाहिकेवर कालावधीनुसार दोन डॉक्टरांची गरज असते. परंतु, काही इतर ठिकाणी झालेल्या भरती प्रक्रियेतून मिळालेल्या नवीन नोकरीमुळे हे पद रिक्त झाले आहे.
बीव्हीजी इंडिया कंपनीला जिल्हा शल्यचिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी विषयाची गंभीरता लक्षात घेता त्वरित दुसरी सोय उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. तसेच याची माहिती नागपूर, पुणे आणि मुंबई येथील संबंधित यंत्रणेला दिली आहे. असे असले तरी यात आठ दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी लोटूनही यंत्रणेकडून कुठलेही ठोस पाऊल उचलले गेले नाही.