वर्धा- उभ्या ट्रकवर रुग्णवाहिका धडकल्याने रुग्णासह दोघेजन गंभीर जखमी झाले आहे. ही घटना समुद्रपूर पोलीस स्टेशन अंतर्गत नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील जुनापाणी शिवारात मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली होती. दोघाही जखमींना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वर्धा : मध्यरात्री रुग्णवाहिकेची उभ्या ट्रकला धडक, रुग्णासह दोघे गंभीर जखमी - नरेश पिदुरकर
उभ्या ट्रकवर रुग्णवाहिका धडकल्याने रुग्णासह दोघेजन गंभीर जखमी झाले आहे. या तिघांवर वर्धेच्या सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे.
कृष्णा पिदुरकर याची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी वणी येथून नागपूरला नेले जात होते. यावेळी नरेश पिदुरकर व महेश पिदुरकर त्याच्यासोबत होते. जुनापाणी शिवारातून जात असताना अचानक उभ्या ट्रकवर रुग्णवाहिका धडकली. यात रुग्ण कृष्णासह त्याच्या सोबत असलेले दोघे जण गंभीर जखमी झालेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठले व जखमींना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. रुग्न कृष्णा पिदुरकरसह इतर दोघांवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.