महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'स्त्रियांच्या असुरक्षिततेमागचे कारण म्हणजे दारू' - स्त्रियांच्या असुरक्षितेचे कारण

डॉ. बंग म्हणाले, "एक निर्भया देशासमोर आली. मात्र, गावोगावी असे अनेक निर्भयाकांड घडत आहेत. यामध्ये 'आरोपी दारूच्या नशेत होता' हे मुख्य कारण अशा घटनांमध्ये दिले जाते. या घटना थांबवण्यासाठी दारुमुक्ती होणे आवश्यक आहे"

जेष्ठ गांधीवादी तथा शोधग्रामचे संचालक डॉ. अभय बंग
जेष्ठ गांधीवादी तथा शोधग्रामचे संचालक डॉ. अभय बंग

By

Published : Jan 30, 2020, 8:29 PM IST

वर्धा -देशात स्त्रियांच्या असुरक्षिततेचे मुख्य कारण दारू आहे, असे वक्तव्य जेष्ठ गांधीवादी तथा शोधग्रामचे संचालक डॉ. अभय बंग यांनी केले आहे. स्त्रियांना मुक्तपणे समाजात वावरायचे असेल आणि त्यांचा सन्मान राखायचा असेल तर, समाज दारू मुक्त व्हायला हवा असेही ते म्हणाले. ते महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त वर्ध्यात आले असता बोलत होते.

जेष्ठ गांधीवादी तथा शोधग्रामचे संचालक डॉ. अभय बंग

डॉ. बंग म्हणाले, "एक निर्भया देशासमोर आली. मात्र, गावोगावी असे अनेक निर्भयाकांड घडत आहेत. यामध्ये 'आरोपी दारूच्या नशेत होता' हे मुख्य कारण अशा घटनांमध्ये दिले जाते. या घटना थांबवण्यासाठी दारुमुक्ती होणे आवश्यक आहे"

शासनाने केवळ दारू बंदीवर न थांबता दारूमुक्तीसाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे. जगातील 26 देशांमध्ये पूर्णपणे दारूबंदी आहे. त्या देशांपासून शिकावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details