महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Akhil Bharatiya Marathi Sammelan : विद्रोही साहित्य संमेलनस्थळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पोहचतात तेव्हा.... - Rebel Literary Conference

वर्ध्याच्या स्वावलंबी शिक्षण मंडळाच्या मैदानावर आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगले असताना सर्कस ग्राउंडवर आज पासून १७ वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच आज उद्घाटन झाले. ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉ अभय बंग यांनी विद्रोही साहित्य संमेलनस्थळी भेट दिली.

Rebel Literary Conference
विद्रोही साहित्य संमेलन

By

Published : Feb 4, 2023, 11:03 PM IST

Updated : Feb 4, 2023, 11:08 PM IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांची विद्रोही साहित्य संमेलनस्थळी भेट

वर्धा : वर्ध्यात ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तसेच १७ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक आणि न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉ अभय बंग यांनी विद्रोही साहित्य संमेलनस्थळी भेट दिली. यावेळी ते काही वेळ विद्रोही मराठी साहित्य संमेलनातील सभामंडपात बसले. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि बंग यांनी दिलेली भेट अनेकांकरीता आश्चर्याची ठरली. यावेळी विद्रोहीच्या सभामंडपात देखील उपस्थितांना आश्चर्य वाटले.

नरेंद्र चपळगावकर संमेलनात भेट : वर्ध्याच्या स्वावलंबी शिक्षण मंडळाच्या मैदानावर आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगले असताना सर्कस ग्राउंडवर आज पासून १७ वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच आज उद्घाटन झाले. एकाच वेळी दोन साहित्य संमेलन वर्ध्यात सुरू आहेत. दोन्ही साहित्य संमेलनाचे साहित्यिक आणि रसिक वेगळ्या वर्गाचे आहेत. आज अचानक ९६ वे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर,ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसेवक डॉक्टर अभय विद्रोही साहित्य संमेलनात दाखल झाले.

संमेलनातील दरी मिटवण्याचा प्रयत्न : संमेलनाअध्यक्ष न्यायमूर्ती चपळगावकर यांनी विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देऊन एक मोठा संदेश दिला आहे. साहित्याचे विभाजन होऊ शकत नाही. समाज बदलला पाहिजे असे सर्वांना वाटते. दोन संमेलन वेगळे झाले तरी हरकत नाही. पण दोघांमध्ये आपुलकी असली पाहिजे. संवाद पाहिजे, येणे-जाणे पाहिजे स्वतः त्यांनी आज येथे येऊन आपल्या प्रत्यक्ष कृतीतून करून दाखवले. हा मोठा पूल त्यांनी दोन्ही साहित्य समेलनात उभा केला.


वर्धेकरांसाठी साहित्याची मेजवानी :एकीकडे वर्धा येथील स्वावलंबी मैदानावर ९६ वे अ.भा.मराठी साहित्य संमेलनात सुरू आहे. तर काही अंतरावर सर्कस मैदानावर 17 वे अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलन रंगले आहे. एकाच वेळी दोन साहित्य संमेलन सुरू असल्याने वर्धेकरांसाठी साहित्याची मेजवानी ठरली आहे.


विद्रोही संमेलनात ५० खोकेच्या घोषणा : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणविस सरकार अस्तित्वात आल्यापासून ५० खोक्यांचा विषय चर्चिला जात आहे. वर्धेत आयोजित 17 व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनात एकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेशभूषा साकारली आणि सभा मंडपात सोबत कार्यकर्त्यांना घेउन खोक्यांसह फिरले. यावेळी ५० खोके एकदम ओक्केच्या घोषणही दिल्या. संमेलनस्थळी ही बाब लक्षवेधक ठरली. महेंद्र मुनेश्वर असे त्यांचे नाव आहे.

हेही वाचा :Satyajeet Tambe Allegation on Congress : काँग्रेस कार्यालयाकडून दोन चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले; सत्यजित तांबेंचा आरोप

Last Updated : Feb 4, 2023, 11:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details