वर्धा -आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी लोकशाहीत आगळा वेगळा प्रयोग करत दहीहंडी फोडल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले, असे विधान राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार Agriculture Minister Abdul Sattar यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्या दहीहंडीवर बोलतांना 50 थर लावतात सर्वात मोठी दहीहंडी फोडल्याच्या वक्तव्यावर अब्दुल सत्तार यांनी शिवसेनला टोला लगावला. ते आज वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त भागात शेतजमिनीच्या नुकसानीची पाहणी दौऱ्यावर होते. सेलू तालुक्याच्या कोटंबा, कोल्ही शिवारात शेताची पाहणी करत नुकसानीची माहिती घेत माध्यमांशी बोलत होते.
'...म्हणून ते आज मुख्यमंत्री झाले' :लोकशाहीत अशा पद्धतीने निर्णय घेत वेगळा प्रयोग केला. गोव्यापासून तर गुवाहाटीपर्यंतचा प्रयोग सर्वांनी बघितला आहे. पक्षाचे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेत जी दहीहंडी फोडली त्याचा परिणाम म्हणून ते आज मुख्यमंत्री झाले. आता मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी मुबंईमध्ये होत असलेल्या दहीहंडी गोविंदाना दहा लाखांचा संरक्षण कवच दिले. त्यामुळे या खेळाडूंना न्याय दिला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे. दोन वर्षात कोरोना संकटात धार्मिक, सामाजिक कार्यक्रम झाले नव्हते. पण एकनाथ शिंदे सरकारने यावेळी खुल्या मनाने, खुल्या दिलाने मदतीची घोषणा केली. विशेषतः दहीहंडीचा सण फार मोठ्या उत्साहाने साजरा व्हावा. येणार्या काळात मुंबई, पुणे व्यतिरिक्त सगळीकडे हा सण मोठ्या उत्साहात साजरा होईल, अशी आशाही व्यक्त केली. दहीहंडीचा सराव करणार्यांचीही दक्षता मुख्यमंत्री यांनी घेतली आहे दहीहंडीच्या कार्यक्रमाला त्यांनी जे पन्नास लोकांचा, पन्नास फुटाचा आणि पन्नास थराचा रूप देणारे पहिले मुख्यमंत्री आहे. ते ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे, असेही सत्तार म्हणाले.