वर्धा - जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे आयोजीत तीन दिवसीय जिल्हा कृषी महोत्सवाचे उदघाटन आज झाले. पण या उदघाटन सोहळ्याला अनेकांनी दांडी मारली असल्याचे पाहायला मिळाले. पण हा कार्यकम दीड तास उशिरा सुरू होऊनही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे कार्यक्रमला योग्य वेळेवर पोहचू शकल्या नाही. कार्यक्रमाला पालकमंत्री सुनील केदार अनुपस्थीत असल्याने खासदार रामदास तडस यांची हस्ते हा उदघाटन सोहळा पार पडला.
महाराष्ट्रात भाजपचे सरकार जाऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. यामुळेच की काय मंत्री नसल्याने अनेकांनी या कार्यक्रमाला दांडी मारली, यात जिल्ह्यातील आमदारांचा समावेश आहे. कार्यक्रमाला मंत्री असले की गर्दी करण्यासाठी अगोदर नियोजन केले जायचे. पण प्रत्यक्षात आज तसे दिसून आले नाही. यामुळे उदघाटन सोहळ्यात मंचावर असलेल्या गर्दीच्या तुलनेत निम्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्याच असल्याचे चित्र दिसून आले.
हेही वाचा -अजित पवार हे आमच्या सरकारची 'स्टेपनी' - संजय राऊत
शेतकऱ्यांना माहिती मिळावी यासाठी काही माहिती केंद्र आणि स्टॉल देखील याठिकाणी लावण्यात आले होते. पण प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त कमर्शियल स्टॉलच अधिक दिसून आल्याचे काही शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. काही चर्चासत्र भरवत माहिती देण्यासाठी संवादाचे आयोजन करण्यात आले. पण शेतकऱ्यांना योग्य माहिती पोहचली नसल्याने ते येऊ शकले नाही.
जर शेतकरी महोत्सवात पोहचत नसतील, तर यंत्रणेने त्यांचा बांधावर जाऊन माहिती देण्याचे नियोजन केल्यास काय हरकत आहे. महोत्सवात कर्मशियल स्टॉल साठी नियोजन करण्यापेक्षा शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून नियोजन केलयास अधिक फायदा होईल. असे मत अनेक उपस्थितींनी व्यक्त केले.
हेही वाचा -धक्कादायक.. नाशिकमध्ये भरयात्रेत चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशाली येरावार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, कृषी व पशु संवर्धन सभापती मुकेश भिसे, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, जिल्हा अधीक्षक अनिल इंगळे, जिल्हा परिषदेे गटनेते नितीन मडावी, विरोधी गटनेते संजय शिंदे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी संजय बमनोटे, आदी मंचावर उपस्थित होते.