वर्धा -स्थानिक नगर परिषदेमध्ये कंत्राटी पद्धतीने कचरा गोळा करणारे, घंटागाडी चालविणारे, डंम्पिंगवर काम करणाऱ्या कामगारांचे शोषण सुरू आहे. योग्य सोयी सुविधांसह कामाचा मोबदला मिळत नसल्याचा आरोप संभाजी ब्रिगेड केला आहे. यासाठी मागील तीन दिवसांपासून कुठलेच पाऊल उचलले गेले नसल्याचेही संभाजी ब्रिगेडचे विदर्भ संघटक तुषार उमाळे यांनी सांगीतले. चर्चेतून मार्ग न निघाल्यास आंदोलन तिव्र केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात वर्धा नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन - News about Wardha Municipality
वर्धा नगर परिषदेच्या कंत्राटी कामगारांचे विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात आंदोलन सुरु आहे. यावेळी चर्चेतून मार्ग निघाला नाहीत तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला.
नगर परिषदेच्या अंतर्गत कामगारांना नियमाप्रमाणे किमान वेतना पेक्षा कमी वेतन दिले जात आहे. सोबतच २६ दिवसांच्या कामाऐवजी ३० दिवस काम घेतले जात आहे. त्याना सुरक्षेच्या दृष्टीने लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले गेलेले नाही. याचा गंभीर परिणाम त्यांच्या जिवनमान आणि प्रकृतीवर होत आहे. असे असतांना ज्यांच्यावर जीवावर शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करून घेतले जाते, त्यांना दिला जाणारा मोबदला हा नियमानुसार 12 हजाराच्या घरात अपेक्षित आहे. पण संबंधित कंत्राटदार एक दिवसही सुट्टी न देता पगार कमी देत आहे. अश्या प्रकारचे काम करणारे साधारण 150 लोक असून त्यांचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली जात आहे.
नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा न झाल्याने नगराध्यक्ष अतुल ताराळे याचसोबत चर्चा झाली. मात्र, योग्य न्याय मिळाला नाही. यात योग्य पर्याय काढावा अशी मागणी जोर धरत आहे. जो पर्यंत नियमानुसार मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहतील असे संभाजी ब्रिगेडचे तुषार उमाळे यांनी सांगितले. बैठकीतून तोडगा न निघाल्या तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.