वर्धा - नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि नागरिक नोंदणी रजिस्टर (एनआरसी) यामुळे संविधान धोक्यात असून आम्ही त्याविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. आंदोलन करणे हा मूलभूत अधिकार असल्याचे औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायाधीशांनी सांगितले असल्याचे नुकताच राजीनामा दिलेले आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान म्हणाले. ते वर्ध्यातील प्रति शाहीनबाग आंदोलनामध्ये बोलत होते.
हेही वाचा -
माझगाव जीएसटी भवनला लागलेली आग आटोक्यात; उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी
वर्धा येथील बाबसाहेब आंबेडकर चौकात आज (सोमवार) पासून सुरू झालेल्या शाहीन भाग आंदोलनामध्ये अब्दुल रहमान यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आम्ही भारताचे नागरिक आहोत, नागरिकत्व हा आमचा अधिकार आहे. या अधिकारावर गदा येत असेल तर आम्ही बाहेर पडलेच पाहिजे. आम्ही नागरिकच नसू तर मग आम्हाला संविधानाचे अधिकारच मिळणार नाही. त्यामुळे जकात हज आणि उमरासाठी लागणारा खर्च आंदोलनासाठी खर्च करावा, असे आवाहन यावेळी रहमान यांनी केले.