वर्धा- चीनी शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग अॅप भारतभर लोकप्रिय आहेत. परंतु भारत आणि चीनच्या वाढत्या संघर्षानंतर चीनी वस्तू, चीनी अॅपवर बहिष्कार टाकण्याची मोहिम भारतभर सुरु झाली. त्यातच केंद्र सरकारने कठोर भूमिका घेत ५९ चिनी अॅपवर बंदी घातली. यामध्ये भारतात लोकप्रिय असलेल्या 'टिकटॉक'चाही समावेश आहे. अशा वेळी 'टिकटॉक'ला प्रतिस्पर्धी असलेले भारतीय अॅप म्हणून 'चिंगारी' या अॅपला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. याशिवाय मित्रो, रोपोसो यासारख्या अॅपची ही चलती भारतात सुरू आहे. दरम्यान, टिकटॉकला अनेक पर्यायी अॅप बाजारात दिसून येत आहेत. या अॅपविषयी, जाणून घ्या खास रिपोर्टमध्ये...
टिकटॉक अॅपने अनेकांना वेड लावले. ते अॅप नेमके होते तरी काय? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. घरातील गृहिणी असो की छोट्याश्या गावात राहणारा एखादा युवक. ज्याला जगात काय घडतंय, हे नक्कीच माहीत नसेल. पण टिकटॉक काय हे माहीत असणारच. शिक्षण, भाषा, अॅप वापरण्याचे तंत्रज्ञान कुठल्याच माहितीची गरज नसणारे. अगदी कोणीही सहज समजू शकेल अशी भुरळ घालणारे हे अॅप 2017 मध्ये भारतात लाँच झाले. अवघ्या काही दिवसातच ते नेटीझन्सच्या पसंतीसही उतरले. दर महिन्याला 12 करोड लोकांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणारे अॅप म्हणजे टिकटॉक.
टिकटॉक बंद झाल्यानंतर त्यावर तासांनतास वेळ घालवणारे युजर हे आता दुसऱ्या अॅपकडे वळले. सध्या ते गरजा आणि तुलनात्मक 'फुलफिल' करनारे अॅप शोधत आहे. यात फेसबुकने सुद्धा भारतात इन्स्टाग्राम सोबत नवीन अपडेटमध्ये रिल्सच्या माध्यमातून टिकटॉकसारखे फिचर देण्याच्या प्रयत्न केला खरा. पण त्या तोडीचा नसल्याचे युजर सांगतायेत. कारण यात विडिओ शूट करतानाच इफेक्टमध्ये जाऊन फिल्टर निवडायचे आहे. यामुळे त्यात टिकटॉकमध्ये दिली जाणारी नंतर एडीटिंगची सुविधा नाही. खैर, व्हिडिओ शूट करताना दिलेले फिल्टर्स असले तरी ते काही खास नसल्याचेही काही युजर सांगत आहेत. यात पुढील काळात आणखी अपडेट होऊन सुधारणा होईल, अशी आशा आहे.
चिंगारी भडकण्याच्या तयारीत -
चिंगारी हे भारतीय अॅप आहे. याला सुद्धा टिकटॉकचा पर्याय म्हणून पसंती मिळत आहे. टिकटॉक बंद झाल्यानंतर जवळपास पाच करोड वेळा डाऊनलोड झालेले हे अॅप आहे. यातही 10 भारतीय भाषा निवडण्याची संधी आहे. हे अॅप बंगलोरच्या कंपनीने बनवले आहे. सोबतच अॅप निवडताना व्हिडिओ सोबत अधिकचे फिचरमध्ये तुम्हाला न्यूज टॅब देण्यात आले आहे. यात गेम झोनमध्ये गेमसुद्धा खेळता येईल, सोबत काही पॉईंट मिळवता, थोडे पैसेही कमावता येणार आहे. चिंगारी अॅप सध्याचा काळात दररोज किमान 1 लाखापेक्षा जास्त डाऊनलोड होत असल्याचा दावा केला जात आहे. हे अॅप 25 एमबीचे असून 1 लाख 27 हजार लोकांनी या अॅपला 3.9 स्टार रेटिंग दिले आहे. टिकटॉकवर बंदी आल्याने, अचानक चिंगारी अॅपवर लोक तुटून पडत असल्याने, या अॅपवरील ट्रॅफिक वाढले आहे. यामुळे डेव्हलपर्स अजून काम करत असल्याचे सांगितले जात आहे. युजरने थोडे पेशन्स ठेवावे लवकर यात सुधारणा होईल, अशीही माहिती डेव्हलपर्सकडून देण्यात आली आहे.
'मित्रो'च्या माध्यमातून लोक जुडण्याचा प्रयत्न -