वर्धा -छत्रपती शिवरायांनंतर देशाचा खरा जाणता राजा कोण असेल तर ते नरेंद्र मोदीच असल्याचे विधान माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी केले आहे. वर्धेच्या बॅचलर रोडवरील सावरकरांच्या पुतळ्याच्या भूमीपूजनाप्रसंगी पत्रकारांशी बोलताना असे अहिर म्हणाले.
छत्रपती शिवरायानंतर नरेंद्र मोदीच जाणते राजे - माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर शरद पवारांना महाराष्ट्राची जनता जाणता राजा म्हणून ओळखते पण त्यांनी जनतेसाठी काय केले ते आता कळू लागले आहे. कुटुंबाच्या पलीकडे त्यांनी कामे केली नाहीत. आम्ही देशाचा, राज्याचा विकास करीत आहोत असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केली. तर दुसरीकडे पंतप्रधानावर स्तुती सुमने उधळली.
हे ही वाचा -राज ठाकरे 'ईडी'च्या चौकशीनंतर गप्प झालेत - अजित पवार
जाणता राजा हा शब्द सर्वांना लागू होत नाही. खरे जाणते राजे आमचे नेते मंडळी आहेत. प्रधानमंत्री मोदी यांनी या देशाची गरज ओळखून देशाच्या विकासाची कामे हाती घेतली. देशाच्या सीमा रक्षणापासून, सुरक्षेपर्यंत, कृषीप्रधान देश आणि लोकसंख्या पाहून कामे हाती घेतली. छत्रपती शिवरायांनंतर देशाचा खरा जाणता राजा कोणी असेल तर ते नरेंद्र मोदी असल्याचे म्हणत माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी नरेंद्र मोदींची स्तुती केली. त्यांनी या देशाचे वैभव जगाला दाखवून दिले. असेही ते म्हणाले.
हे ही वाचा -..यांच्या रुपाने महाराष्ट्राला आर. आर. आबांचे कर्तृत्व मिळेल - शरद पवार
भाजपमध्ये सुरू असलेली मेगाभरती ही मोदींचे आकर्षण असल्याने होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीतील मंडळी मोदी, फडणवीस यांची कार्यशैली पाहून भाजपमध्ये येत आहे. कोण कोणाला सोडत आहे याला महत्व नाही. पंतप्रधान मोदी यांची कार्यशैली पाहून हे लोक भाजपमध्ये येत असल्याचे मत त्यांनी हंसराज अहिर यांनी व्यक्त केले.
हे ही वाचा -'ते मला सोडून गेले, याचं दुःख माझ्या अंत:करणात कायमच राहील'