महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चोविस तासानंतर वणा, वर्धा नदीच्या संगमावर मिळाला अभयचा मृतदेह, दोघींचा शोध सुरू - चार जण नदीपात्रात बुडाल्याची घटना

हिंगणघाट येथे हरितालिकेचे विसर्जन करण्यासाठी गेलेले चार जण नदीपात्रात बुडाल्याची घटना सोमवारी घडली होती. त्यामध्ये आतापर्यंत एक महिलेचा शोध लागला आहे, तर १० वर्षीय मुलाचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. उर्वरीत दोघींचा शोध पुन्हा सुरू आहे.

मृत अभय

By

Published : Sep 3, 2019, 11:38 PM IST

Updated : Sep 4, 2019, 7:49 AM IST

वर्धा - जिल्ह्यातील हिंगणघाट येथे हरितालिकेच्या विसर्जनासाठी गेलेले चार जण नदीपात्रात बुडाल्याची घटना सोमवारी घडली होती. अवघ्या काही तासातच रिया भगत या महिलेला काढण्यात यश आले. तब्बल २४ तासानंतर मंगळवारी १० वर्षीय अभयचा मृतदेह आढळून आला. मात्र, अद्यापही लहान मुलगी अंजना आणि महिला दिपाली बेपत्ता आहे.

हिंगणघाटमधील दुर्घटनेबाबत बोलताना आमदार समीर कुणावार

हिंगणघाटच्या घाटावरून वाहत गेलेल्या तिघांनाही शोधण्याची मोहीम एसडीआरएफच्या माध्यमातून सोमवारपासून बोटीच्या सहाय्याने सुरू करण्यात आली. याचबरोबर मासेमारी करणाऱ्या बांधवांनी ट्यूबच्या साहाय्याने शोध घेतला. मात्र, कुणाचाही शोध लागला नाही. अखेर सोमवारी अंधार पडल्यानंतर शोधमोहीम थांबवण्यात आली.

शोधमोहीम मंगळवारी सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आली. वणा नदी चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर वर्धा नदीला जाऊन मिळते. यामध्ये मंगळवारी ४ वाजण्याच्या सुमारास १० वर्षीय चिमुकला अभयचा मृतदेह धानोरा मांढळी पुलाजवळच्या काही लोकांना दिसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या भागात शोधमोहिम राबवण्यात आली. त्यांनतर घटना स्थळापासून जवळपास ५० किमीवर अभयचा मृतदेह आढळून आला. सायंकाळी उशिरापर्यंत शोध मोहिम सुरू होती. मात्र, १३ वर्षीय अंजना आणि शेजारी राहणारी महिला दिपाली यांचा शोध लागला नाही. बुधवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहिम राबवण्यात येणार आहे.

हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार स्वतः एसडीआरएफच्या बोटीत बसून शोधकार्यात सहभागी झाले आहेत. यावएळी त्यांनी कुटुंबियांना दुःख पचवण्यास बळ मिळो, अशी प्रार्थना केली. तसेच पावसामुळे शोधकार्यात अडचण निर्माण होत आहे. मात्र, लवकरच बाकी असलेल्या दोघींनाही शोधण्यात यश येईल, असे ते म्हणाले. मात्र, निवडणुका जवळ आल्याने केलेला हा खटाटोप तर नाही ना, अशी चर्चा रंगली आहे.

Last Updated : Sep 4, 2019, 7:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details