वर्धा- आर्वी येथील दिवाणी फौजदारी न्यायालयातील कार्यरत वकील संघाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पैसे गोळा केले. पाहता पाहता 1 लाख 2 हजार 50 रुपयांची रक्क्म जमा झाली. एरवी न्यायालयात आपल्या पक्षकारासाठी लढा देणारे वकील आता कोरोनासोबतच्या लढ्यासाठी समोर आले.
कोरोनाच्या लढ्यात आर्वी वकील संघाचा हातभार, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत - कोरोनाच्या लढ्यात आर्वी वकील संघाचा हातभार
कोरोनाचा लढा हा कोणा एकट्याचा नसून संपूर्ण मानवजातीला हा लढा द्यायचा आहे. महाराष्ट्र सध्या संकटातून जात असताना आपणही मदतीचा हात द्यावा, असा निर्णय वकील संघाने घेतला. यात बार असोसीएशनमध्ये काम करणाऱ्या साधरण 28 जणांनी मदत करत 1 लाख 2 हजार पाचशे रुपये गोळा केले.
![कोरोनाच्या लढ्यात आर्वी वकील संघाचा हातभार, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत कोरोनाच्या लढ्यात आर्वी वकील संघाचा हातभार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6943021-587-6943021-1587865652200.jpg)
कोरोनाचा लढा हा कोणा एकट्याचा नसून संपूर्ण मानवजातीला हा लढा द्यायचा आहे. महाराष्ट्र सध्या संकटातून जात असताना आपणही मदतीचा हात द्यावा, असा निर्णय वकील संघाने घेतला. यात बार असोसीएशनमध्ये काम करणाऱ्या साधरण 28 जणांनी मदत करत 1 लाख 2 हजार पाचशे रुपये गोळा केले. अशा पद्धतीने रक्कम गोळा करणारा आर्वी बार असोसिएशन पहिलाच असल्याचे संघाच्यावतीने सांगितले जात आहे.
रकमेची पावती उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांना सोपवण्यात आली. यावेळी अॅड. अशोक धारस्कर, नागेश पुजारी, संजय तिरभाने, मंगेश करडे, राजेंद्रसिंग गुरुनान सिघांनी, योगेश राठी, दिनेश काळबांधे, गणराज चव्हाण, अविनाश चौधरी, विशाल पुजारी, स्वाती देशमुख यासह वकील संघाच्या इतर सदस्यांनी मदत केली.