वर्धा - जिल्ह्यातून जात असलेल्या नागपूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सावळी (खुर्द) फाट्याजवळ दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली. अपघात सायंकाळी ७ च्या सुमारास झाला असून यात दुचाकीस्वार ठार झाला. मृताचे नाव भोजराज महादेव रमधम (३१) असे आहे.
अज्ञात वाहनाची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार - अज्ञात वाहनाची धडक
मृताचे नाव भोजराज महादेव रमधम (३१) असे आहे. जखमीचे नाव नरेश डोंगरे असून त्याला कारंजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यावेळी भोजराजसोबत आणखी एकजण दुचाकीने येनगावमध्ये जात होता. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. भोजराज महिंद्रा फायनान्स कंपनीत काम करत होता. कर्ज वसूलीला जात असताना त्याचा अपघात झाला. जखमीचे नाव नरेश डोंगरे असून त्याला कारंजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, मागील १५ दिवसांपूर्वी अशाच प्रकारे अन्य एक व्यक्ती सायंकाळी काम संपवून घरी येत होता. यावेळी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.