महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

समुद्रपूरमध्ये विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबीयांना घातपाताचा संशय

समुद्रपूर शहरातील एका विवाहीतेने घरी कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह झालेला असताना अचानक गळफास घेत आत्महत्या कारण्याचे टोकाचे पाऊल का घेतले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

समुद्रपूरमध्ये विवाहितेचा गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप

By

Published : Nov 9, 2019, 3:28 PM IST

वर्धा -समुद्रपूर शहरातील एका विवाहीतेने घरी कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह झालेला असताना अचानक गळफास घेत आत्महत्या कारण्याचे टोकाचे पाऊल का घेतले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दीक्षा विजेंद्र वासेकर (वय-23) मृताचे नाव आहे. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मृत महिलेचे कुटुंबीय करत आहेत.

समुद्रपूरमध्ये विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप

हेही वाचा - जालन्यातून आठ मोटार सायकलींसह चोराला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश

दीक्षा व विजेंद्र यांचा दोन वर्षापूर्वी प्रेम विवाह झाला होता. शुक्रवारी सकाळी दीक्षाचे पती विजेंद्र वासेकर हा एका खासगी उपहारगृहात काम करत असल्याने तो तेथे गेला होता. तर दिक्षाचे सासू सासरे हे दोघेही जाम येथील आठवडी बाजारात गेले होते. यावेळी घरी कोणीच नसताना दीक्षाने घरी पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांनी तत्काळ ही माहिती पोलीस प्रशासनाला कळवली. त्यनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचली.

महिलेने आत्महत्या का केली? याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. दिक्षाने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप दीक्षाच्या नातलगांनी केल्याने प्रकरणाला नवीन वळण आले आहे. यासंबंधी तक्रार देण्यासाठी दिक्षाचे नातेवाईक रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात होते. घटनास्थळी समुद्रपूर पोलिसांनी दाखल होऊन पंचनामा केला असून पोलीस तपास सुरू आहे.

हेही वाचा - नाथसागर धरणाच्या पाण्यात आढळला महिलेचा मृतदेह

ABOUT THE AUTHOR

...view details