महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात पाचशे रुपयांच्या वादातून युवकाची हत्या; अल्पवयीन मुलाला अटक, वडील फरार - भीमनगर

शहरातील भीमनगर भागात पाचशे रुपयांच्या वादातून एका युवकाची हत्या झाल्याची घटना घडली. प्रणल भगत असे मृत युवकाचे नाव आहे.

वर्ध्यात पाचशे रुपयांच्या वादातून युवकाची हत्या

By

Published : Sep 21, 2019, 8:09 AM IST

Updated : Sep 21, 2019, 11:48 PM IST

वर्धा - शहरातील भीमनगर येथे गुरुवारी पैशाच्या वादातून युवकाची हत्या झाली आहे. प्रणल भगत असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे, तर त्याचे वडील राजेश यादव फरार आहे.

वर्ध्यात पाचशे रुपयांच्या वादातून युवकाची हत्या

हेही वाचा - बीडमध्ये जुन्या वादातून शिक्षकाचा खून; आरोपी फरार

शहरातील भीमनगर परिसरात राहणाऱ्या प्रणलचा मित्र प्रफुल तेलंगला एका घराची साफसफाई करायची होती. या कामासाठी प्रणलचे शेजारी राजेश यादव यांना काम देण्यात आले होते. त्यासाठी त्यांना 500 रुपये देण्याचे ठरले होते. यानंतर यादव यांनी ते पाचशे रुपये प्रणल यांच्याजवळ ठेवले व ते साफसफाईसाठी घर पाहायला गेले. मात्र, घराच्या खोल्या जास्त असल्याचे सांगत यादव यांनी काम नाकारले.

हे ही वाचा -आगामी विधानसभेत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या हाती येणार अपयशच - बावनकुळे

दरम्यान, यादव यांनी प्रणलला पाचशे रुपये परत मागितले. काम केले नसल्याने त्याने पैसे प्रफुल तेलंगला परत दिल्याचे सांगितले. मात्र, पैसे परत दिल्याच्या कारणावरून राजेश यादव यांनी प्रणलसोबत वाद घातला. तसेच सायंकाळच्या सुमारास दारू पिऊन त्याला शिवीगाळ केली. याचाच राग मनात असल्याने प्रणलने सायंकाळी जेवण झाल्यानंतर राजेश यादव यांना बाहेर भेटायला बोलाविले. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. प्रणलने यादव यांना मारहाण केली.

हे ही वाचा -एकाच घरावर दोन झेंडे? वडील राष्ट्रवादीत, तर मुलगा व सून सेनेत; कार्यकर्ते म्हणतायेत कोणता झेंडा घेऊ हाती?

वडिलांना मारहाण होत पाहत त्यांच्या अल्पवयीन मुलानेही प्रणलला चाकुने मारहाण केली. त्याच्या पोटावर मानेवर वार केले. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून वडिलांचा शोध सुरू आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी दिली आहे.

हे ही वाचा -अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणाचे पाच दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Last Updated : Sep 21, 2019, 11:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details