महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महात्मा गांधींच्या दक्षिण आफ्रिका प्रवासाच्या रेल्वे डब्याची प्रतिकृती वर्धा रेल्वेस्थानकात बसवणार - वर्धा सुनिल केदार बातमी

जिल्ह्याच्या रेल्वे स्थानकात महात्मा गांधी यांचे दक्षिण अफ्रिकेतील पहिल्या रेल्वे प्रवासावर प्रकाश टाकण्यासाठी त्या रेल्वेच्या डब्याची प्रतिकृती बसविण्यात येणार आहे. ही प्रतिकृती 2 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री सुनिल केदार यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

sunil kedar
sunil kedar

By

Published : Aug 9, 2020, 8:18 PM IST

वर्धा- महात्मा गांधी यांच्या दक्षिण अफ्रिकेतील पहिल्या रेल्वे प्रवासाच्या आठवणीनिमित्त त्या रेल्वे डब्याची प्रतिकृती वर्ध्याच्या रेल्वे स्थानकात उभारणार आहे. ज्या रेल्वेच्या डब्यातून त्यांनी पहिला प्रवास केला. त्याची प्रतिकृती वर्ध्याच्या रेल्वे स्थानकावर तयार करणार असल्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी जाहीर केले. विशेष म्हणजे हे काम 2 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याच्या अनुषंगाने पाऊले उचलण्याचा सूचना त्यांनी केल्या आहेत.

सेवाग्राम विकास आराखड्यातील काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रशासनाने गतीने काम पुर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यासाठी जिल्ह्याच्या प्रवेश द्वारावर जिल्ह्याची ओळख ठरलेला नीलकंठ पक्षाची भव्य प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. धामनदीच्या एकाच किनाऱ्यावरील विकासकामे झाली आहे. दुसऱ्या बाजूचेही कामे तात्काळ सुरू करावे. देशात कुठेही पाहायला मिळणार नाहीत, असे महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे भव्य शिल्प तयार करण्याचे काम सुरू आहे. शिल्प तयार करण्याचे काम जे जे स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थी व शिक्षणकांडून केले जात आहे.

सेवाग्राम विकास आराखड्याच्या निधीतून शहरातील विविध चौकांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. काही ठिकाणचे काम अद्याप सुरुच आहे त्या कामाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी मोठ्या कंपन्या, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि मोठे शासकीय कार्यालये यांना सोपविण्यात यावे, अशी सूचना पालकमंत्री यांनी केली. जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात बैठक घेऊन याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात.

सेवाग्राम आणि पवनार आश्रमाची माहिती इतर जिल्ह्यातून परदेशातून येणाऱ्या नागरिकांना व्हावी यासाठी नागपूर विमानतळ, रेल्वे स्थानक, वर्धा रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावर ऐतिहासिक माहिती देणारे केंद्र उभारण्यात यावे, असेही पालकमंत्री केदार यांनी सांगितले. जिल्ह्याच्या प्रत्येक मोठ्या शासकीय कार्यालयात चरख्याची प्रतिकृती बसवा, धामनदीच्या पात्रात पाण्याचे मोठे कारंजेही उभारण्यात यावे अशा सूचना पालकमंत्री केदार यांनी सांगितले.

यावेळी अडारकर असोसिएट यांनी आतापर्यंत झालेल्या कामांचे सादरीकरण केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सेवाग्राम विकासकामाबाबत पालकमंत्री सुनील केदार यांनी घेतलेल्या बैठकीला जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, सेवाग्राम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन. प्रभू, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे, अधीक्षक अभियंता टाके, सामाजिक वनिकरण विभागाचे जोशी, उपअभियंता मंत्री, यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details