महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

श्वानासह पिंजऱ्यात कोंडून केले आंदोलन; श्वान जन्मदर नियंत्रण करण्याची मागणी - aashish goswami animal movement wardha

मागील चार वर्षांपासून श्वान जन्मदर नियंत्रण करण्यासाठी प्रशासनाकडून कुठलाही ठोस पाऊल उचलण्यात आला नाही. वारंवार लक्ष देण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळेच सदर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी पीपल फॉर अ‌ॅनिमलचे आशिष गोस्वामी यांनी श्वानासह स्वतःला पिंजऱ्यात कोंडून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

wardha
आशिष गोस्वामी

By

Published : Nov 28, 2019, 7:39 PM IST

वर्धा- मागील चार वर्षांपासून श्वान जन्मदर नियंत्रण करण्यासाठी कुठलेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. वारंवार लक्ष देण्याची मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. यामुळेच सदर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी पीपल फॉर अ‌ॅनिमलचे आशिष गोस्वामी यांनी श्वानासह स्वतःला पिंजऱ्यात कोंडून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे हे आंदोलन करत कुत्र्यांचा जन्म दर नियंत्रणात आणण्याची मागणी करण्यात आली.

माहिती देताना पीपल फॉर अॅनिमलचे आशिष गोस्वामी

जिल्ह्यात मागील चार वर्षांपासून कुत्र्यांचा जन्मदर नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात आलेला नाही. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूणही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पीपल फॉर अ‌ॅनिमलचे आशिष गोस्वामी यांनी आगळे वेगळे आंदोल करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यांनी एका बेवारस कुत्र्यासह स्वतःला पिंजऱ्यात कोंडले. या माध्यमातून गोस्वामी यांनी बेवारस कुत्र्यांच्या बंदोबस्ताकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले. जर प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही तर आपण आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील गोस्वामी यांनी दिला.

शहर आणि ग्रामीण भागात बेवारस कुत्र्यांच्या संख्येत वाढ

सध्या सर्वत्र शहर आणि ग्रामीण भागात बेवारस कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे श्वान दंशाच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. रात्री-बेरात्री प्रवास करतांना वाहनांमागे धावणारे कुत्रे, यामुळे होणारे अपघात यात मोठ्या संख्येत वाढ झाली आहे. शासकीय आकडेवारीनुसार जिल्हा सामान्य रुग्णालायात साधारण ३० हजारापेक्षा अधिक श्वानदंशाचे रुग्ण नोंदवले जातात. या घटनांमुळे शहारासश ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लहान मुलांना मोठ्या प्रमाणात धोका

बेवारस कुत्र्यांमुळे लहान मुलांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. अनेकदा लहान मुले कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याच्या घटना शहरात घडलेल्या आहेत. दरम्यान, पिंजऱ्यात कुत्र्यांसह बंद असलेल्या गोस्वामी यांना पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. आंदोलनाचा विषय ऐकताच अनेकांनी त्यांचे कौतुक केले.

हेही वाचा-वर्ध्यातील वैद्यकीय जनजागृती मंचाच्या कार्याचे 'जल'शक्ती मंत्रालयाकडून कौतुक

ABOUT THE AUTHOR

...view details