वर्धा -वन्य प्राण्यांमुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कारंजा तालुक्यातील बांगडापूर येथेजंगल परिषद भरवण्यात आली होती. वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. शेतातील उभ्या पीकांचे नुकसान आणि प्राण्यांचे हल्ले यात वाढ झाल्याने सर्वांनी एकत्र येत या परिषदेच्या माध्यमातून विचार मंथन केले.
कारंजा तालुक्यातील आगरगाव येथे एक युवा शेतकरी वाघाच्या हल्ल्याचा बळी ठरला. परिसरातील शेतकरी या घटनेने चांगलेच भयभीत झाले आहेत. याच कारणाने गावातील लोकांनी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कारही टाकला होता. प्रश्न सुटत नसल्याने हे लोक एकत्र आले आहेत. जंगला संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी जंगलातच परिषद घेऊन त्यावर विचारविनिमय करण्यात आला.