वर्धा- जिल्ह्यातील 9 कोरोनाबाधितांवर सेवाग्राम आणि सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. वर्ध्याचे तीन तर इतर सहा रुग्ण हे बाहेरून आलेले आहे. बुधवारी प्राप्त अहवालात 3 नवे रुग्ण हे आढळून आले. हिवरा तांडा मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील 28 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात सोमवारी मुंबईतून आलेल्या कुटुंबातील तिघे कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन करून सहा जणांचे नमुने घेण्यात आले. यातील चौघांचे नमुने निगेटिव्ह असून दोघांचे अहवाल अनिर्णायक असल्याने पुन्हा चाचणी केली जाणार आहे.
धामणगाव येथील 22 वर्षीय युवती तपासणीसाठी सावंगी रुगणालाय उपचारार्थ दाखल झाली आहे. तिच्यासोबत काहींचे चाचणी अहवाल हे अनिर्णयाक आल्याने पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात आले. सावंगी रुगणालयात 5 कोरानाबाधित उपचार घेत आहेत. यातील एक रुग्ण हा गोरखपूरचा असून त्याच्यावरही सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात उपचार घेत असलेला एक रुग्ण वाशिम येथील आणि नव्याने आर्वी तालुक्यातील जामखुटा येथील एकाच कुटुंबातील तीन जणांवर सेवाग्रामच्या कोव्हिड केअर रुगणालयात उपचार सुरू आहेत. अमरावती जिल्ह्यातील 4 आणि 1 गोरखपूर येथील मजूर अशा पाच जणांवर सावंगीच्या आचार्य विनोबा भावे रुग्णालयात उपचार सुरू आहे.
वर्धा जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती
- बाहेर जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांवर उपचार सुरू
- वर्धा जिल्हा - 3 कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम
- वाशिम - 1 कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम
- अमरावती - 4 विनोबा भावे रुग्णालय,सावंगी
- गोरखपूर -1 विनोबा भावे रुग्णालय,सावंगी
एकूण - 9